रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:15 PM2018-07-23T17:15:57+5:302018-07-23T17:19:26+5:30

महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत.

1948 application for loan waiver from the Ratnagiri district, 34 thousand 581 farmers benefited from this | रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

Next
ठळक मुद्देअद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत. जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी भरले आॅनलाईन अर्ज

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. या योजनेंतर्गत सन २००१ ते २००९ अखेर कर्जमाफी घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत.

सलग चार वर्षे (२०१२ ते २०१६) अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे ते नव्याने कर्ज घेऊ शकलेले नाहीत. राज्य शासनाने २०१७मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखावरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी आहेत.

त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते कर्जमाफीसाठी पात्र झाले होते. पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.

सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु, त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १,९४८ आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आले आहेत.

शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ ग्रीनलीस्ट देण्यात आल्या. काही कर्जदारांचा समावेश यलो लीस्टमध्ये करण्यात आला. जुन्या यादीप्रमाणे १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, त्यांचा कोणत्या यादीत समावेश करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

राज्य शासनाकडून आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत दोनवेळा वाढवली होती. त्याचवेळी २००१ ते २००९ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला होता. त्यामुळे १५ जूनपर्यंत नव्याने आॅनलाईन माहिती भरण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी झाली आहे.

Web Title: 1948 application for loan waiver from the Ratnagiri district, 34 thousand 581 farmers benefited from this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.