आठवड्याचे राशीभविष्य - 12 मे ते 18 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 09:53 AM2019-05-13T09:53:33+5:302019-05-13T09:55:31+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscopes 12 may 2019 to 18 may 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 12 मे ते 18 मे 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 12 मे ते 18 मे 2019

Next

मेष 

 

आठवड्याच्या सुरुवातीस सुख व आनंदाची प्राप्ती होईल. आपल्या बुद्धी चातुर्याने आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. विक्रीशी संबंधित नोकरी करणाऱ्यांना आठवड्यात फायदा होऊ शकेल. व्यवसायात जाळे विस्तारण्याकडे आपण लक्ष द्याल. त्यामुळे आपला भविष्यात फायदा होऊ शकेल. आर्थिक बाबतीत आपल्या महत्वाकांक्षा वाढतील. घाई करण्यात आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते. सध्या दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवसांची आपणास वाट पाहावी लागेल... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखाद्या वादात अडकाल. नोकरीत आपणास नवीन काही शिकावे लागेल. हे शिकूनच आपण पुढील कामे करू शकाल. हे कौशल्य पुढे सुद्धा उपयोगी येईल. व्यापारात भागीदाराशी संवाद साधताना काळजी घ्यावी. मात्र, आठवड्याचे अखेरचे दिवस अनुकूल आहेत. आपण भौतिक सुख - सोयी वाढविण्यासाठी पैसे खर्च कराल. विद्यार्थ्यांनी सामूहिक अध्ययना पासून दूर राहावे. आठवड्याच्या अखेरीस आपला एखादा प्रकल्प सहजपणे पूर्ण होईल... आणखी वाचा

मिथुन

आठवड्यात आपण एखाद्या नवीन कामाचा आरंभ करू शकाल. सामाजिक जीवनात आपण यशस्वी व्हाल. आठवड्यात आपण कार्यालयीन किंवा व्यापारी कामासाठी एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कोणत्याही परिस्थितीत आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यालयात सहकाऱ्यांचे आपणास सहकार्य लाभेल. एखाद्या नवीन प्रकल्पाचे कार्य सुरु करू शकाल. आठवड्याची अखेर आपल्यासाठी चांगली असेल. व्यापार वृद्धी झाल्याने आपण आनंदित व्हाल... आणखी वाचा

कर्क

आठवडा अंशतः चांगला राहील. सार्वजनिक कार्यात आपणास यश लाभेल. आठवड्यात एखादे नवीन काम सुरु करू शकाल. नोकरीत प्रगती होऊ शकेल. व्यापारात सुद्धा नवीन प्रकल्प सक्षमपणे हाताळू शकाल. या आठवड्यात आपली सर्जनशीलता आपणास घर सजावटीसाठी किंवा त्यात काही बदल करण्यासाठी प्रेरित करू शकेल. नवीन वस्त्र खरेदी करण्यासाठी पैसा खर्च होईल. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात अनावश्यक कामांवर निश्चितपणे खर्च होऊ शकेल... आणखी वाचा

सिंह

आठवड्यात काही नकारात्मक विचार मनात येऊन आपण विचलित व्हाल. नोकरीत किंवा व्यापारात गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. व्यापार वृद्धीसाठी काही आवश्यक खर्च करावा लागेल. आठवड्यात कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळावा. व्यावसायिक क्षेत्रासाठी हा आठवडा विशेष लाभदायी आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहणे हितावह होईल. सार्वजनिक ठिकाणी आपणास सन्मान प्राप्त होईल. हौस - मौज करण्यासाठी पैसे खर्च करू शकाल... आणखी वाचा

कन्या 

आठवडा आपल्यासाठी उत्तम असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात नोकरीत काही फायदे होतील. सहकाऱ्यांशी आपली वागणूक चांगली असल्याने आपणास सुद्धा त्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. आपण प्राप्तीची नवीन साधने शोधण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. आठवड्यात संततीची प्रगती होईल, ज्यामुळे आपण आनंदित व्हाल. कौटुंबिक जीवन उत्तम राहील... आणखी वाचा

तूळ

आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. कार्यालयीन सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. विरोधकांवर मात करू शकाल. सरकारी कागदपत्रात फेरफार झाल्याने आपल्या चिंतेत वाढ होईल. अशा परिस्थितीत मूळ कागदपत्रे जपून ठेवावीत. ह्या आठवड्यात स्त्री मित्रांमुळे नुकसान संभवते. एखादा लहानसा प्रवास होऊ शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. मात्र, त्यांना पूर्णपणे अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे लागेल.  मौज - मजा करण्यात दिवस घालवाल... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा आपल्यासाठी उत्तम असणार आहे. हळू हळू का होईना, आपली कामे होतीलच. विरोधकांनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही आपण त्यावर मात करू शकाल. आपण मात्र आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे. यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. नोकरीत बढती किंवा आवडत्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांना मात्र, आठवड्या दरम्यान अभ्यासात अडचणी येतील... आणखी वाचा

धनु

आठवडा आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. अशा परिस्थितीत आपण भविष्याचे नियोजन सुद्धा करू शकाल. नोकरी - व्यवसायात फायदा होऊ शकेल. कार्यालयात वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करत असल्याचे दिसून येईल. आपल्या कामात काही बदल होण्याची अपेक्षा सुद्धा आपण बाळगू शकता. व्यवसायात भागीदार आपल्या कामाचे व कौशल्याचे कौतुक करतील. ह्या आठवड्यात आपण नवीन गिर्हाईकांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक व इतर तत्सम कार्यात खर्च होईल... आणखी वाचा

मकर

आठवड्यातील सुरुवातीचे दोन दिवस प्रतिकूल असले तरी दुसरे पर्व आपल्यासाठी उत्तम आहे. आपण दिशाहीन व्हाल. व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात कामाचा व्याप राहील. एकाच वेळी अनेक कामात आपण व्यस्त राहाल. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्धी आपल्या कामात विघ्न आणण्याचे प्रयत्न करतील. मात्र, दुसऱ्या पर्वत आपण कामाचा आनंद लुटू शकाल व आपणास प्राप्तीचा नवीन मार्ग सुद्धा सापडू शकेल. कौटुंबिक जीवनात सुद्धा काही अडचणी उदभवतील... आणखी वाचा

कुंभ

आठवडा एकंदरीत आपल्यासाठी उत्तम राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ह्या आठवड्याची सुरवात चांगली राहणार आहे. धन लाभ संभवतो. कार्यालयात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरिष्ठाना आपले कौशल्य दाखवण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपल्या मान - प्रतिष्ठेत वृद्धी होऊ शकेल. मात्र, अनावश्यक खर्चांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. त्यांचे अभ्यासात लक्ष लागून यश प्राप्ती सुद्धा होऊ शकेल... आणखी वाचा

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास काही त्रास होऊ शकतो, मात्र नंतर आपणास तो दूर झाल्याचे जाणवू लागेल. ह्या आठवड्यात आपण दैनंदिन काम न करता आपल्या पसंतीचे काम करण्यात अधिक स्वारस्य दाखवाल. आपल्या कष्टाचे सुखद फल सुद्धा मिळू शकेल. मात्र, आपण नवीन कामा पासून दूर राहणे हितावह राहील. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. ह्या दरम्यान आपण नवीन कामा ऐवजी जुन्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे हितावह राहील... आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscopes 12 may 2019 to 18 may 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.