आजचे राशीभविष्य - 28 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 07:27 AM2019-05-28T07:27:45+5:302019-05-28T07:28:14+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 28 May 2019 | आजचे राशीभविष्य - 28 मे 2019

आजचे राशीभविष्य - 28 मे 2019

मेष - आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील असे गणेशजी सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. अधिक वाचा

वृषभ - सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल व गणेशजींचा आशीर्वाद आपणाला आहे. तब्बेतही छान राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. अधिक वाचा

मिथुन - संमिश्र फलदायी दिवस जाईल असे गणेशजी सांगतात. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. अधिक वाचा

कर्क - आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. रागाला आवर घाला. अधिक वाचा

सिंह - आज आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील असे गणेशजी सांगतात. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. अधिक वाचा

कन्या - गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. अधिक वाचा

तूळ - लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. अधिक वाचा

वृश्चिक - आज हट्ट सोडा असे गणेशजी सुचवितात. भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. अधिक वाचा

धनु - आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. अधिक वाचा

मकर - आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. अधिक वाचा

कुंभ - आज आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अधिक वाचा

मीन - कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेशजी देतात. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. अधिक वाचा

 

Web Title: Today's zodiac sign - 28 May 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.