तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:28 AM2019-02-19T03:28:21+5:302019-02-19T03:28:33+5:30

संतोष कोळी : पिगोंडे ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली

Young people can join the army to protect the country | तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे

तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे

Next

नागोठणे : आता फक्त निषेध करून भागणार नाही, आपण आता देशासाठी जागृत होण्याची वेळ आली आहे. सर्व तरु णांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे, असे भावनिक आवाहन पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांनी केले. पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने वेलशेत, आंबेघरच्या बस पार्किंगच्या मैदानात पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी कोळी बोलत होते.

पुंडलिक ताडकर यांनी या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीन हे दोन देश वगळता जगभरातील सर्वच देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल, तर सर्व नागरिकांनी चिनी वस्तूंवर आजपासून बहिष्कार घालावा, असे आवाहन केले. येथील आंबेघरचे दहा जवान देशाच्या रक्षणासाठी आजही भारताच्या सीमेवर राहून देशसेवा करीत आहेत, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. परवाच्या हल्ल्यानंतर स्वत: त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते सर्वच सुखरूप आहेत व पाकिस्तानच्या नांग्या चेचणारच, असे त्यांनी अभिमानाने सांगितले असल्याचे बळीराम बडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर करावे, आम्ही आजही देशसेवेसाठी सीमेवर यायला आहोत, असे सांगितले. ग्रामसेवक राकेश टेमघरे यांनी यावेळी शहीद जवानांच्या सहाय्यता निधीसाठी आपला पाच दिवसांचा पगार देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली वेलशेत आणि आंबेघर या दोन्ही गावांमध्ये फिरविण्यात आली.
यावेळी उपसरपंच सखाराम घासे, ग्रा. पं. सदस्य नाना बडे, कांचन माळी, रंजना माळी आदींसह दोन्ही गावांतील शेकडो नागरिक उपस्थित होते.

श्रीरामनगरमध्ये पाकिस्तानचा निषेध
च्खोपोली : शहीद जवान अमर रहे, पाकिस्तानला धडा शिकवा या व इतर घोषणांनी लौजी, श्रीरामनगर परिसर दणाणून गेला. काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिरात अर्पण केली.
च्लौजी, उदयविहार व श्रीरामनगर परिसरात मेणबत्ती रॅली काढण्यात आली. श्रीराम मंदिरात आल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, विद्यमान नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक अमोल जाधव आदींनी विचार मांडताना केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलावीत, दहशतवादी संघटनांचा बीमोड करावा आदी मागण्या केल्या.

च्कर्जत : तालुक्यातील कशेळे येथील व्यापारी फेडरेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत कशेळे यांच्या वतीने पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
च्कशेळे गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली सभेला उपस्थित होते, तसेच कशेळे गाव आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. व्यापाºयांच्या वतीने उदय पाटील यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून तरु णांनी या पुढे १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे न पाळता शहीद दिन पाळावा अशी सूचना के ली.
च्हल्ल्याचे राजकीय भांडवल न करता आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठाम उभे राहून या हल्ल्याविरोधात जी काही कार्यवाहीचा निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी कशेळे ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पोखरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नेरळमध्ये कॅण्डल मार्च
नेरळ : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवारी रात्री कॅण्डल मार्च काढण्यात आला. नेरळ गावातील नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते. कॅण्डल मार्चनंतर नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवार १७ फेब्रुवारी रोजी नेरळकर या नावाखाली कॅण्डल मार्च काढला. कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील जकात नाका येथून निघालेला कॅण्डल मार्च माथेरान रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशन येथे पोहचला. या कॅण्डल मार्चमध्ये नेरळमधील सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. कॅ ण्डल मार्चला सुरु वात होण्याआधी मोहाचीवाडी येथून महिला आणि विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून आपला सहभाग नोंदविला.
आम्ही नेरळकर यांनी आयोजित केलेला कॅण्डल मार्च हुतात्मा भाई कोतवाल चौकात पोहचल्यानंतर तेथे शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी तेथे नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, माजी सरपंच सावळाराम जाधव आदींची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहीद जवानांसाठी एक निधी संकलित करून पाठवावा असा निर्णय घेतला. यावेळी नेरळ परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, कर्जत पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: Young people can join the army to protect the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड