यंदा गणेशमूर्तींनाही बसणार जीएसटीची झळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 03:17 AM2018-07-18T03:17:58+5:302018-07-18T03:18:16+5:30

गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.

This year Ganesh idols will be able to meet GST! | यंदा गणेशमूर्तींनाही बसणार जीएसटीची झळ!

यंदा गणेशमूर्तींनाही बसणार जीएसटीची झळ!

Next

आगरदांडा : गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तींनाही जीएसटीची झळ बसल्याने त्यांच्या किमतीत वाढ होणार आहे.
गणेशमूर्तींवर १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने एक हजार रुपयांच्या मूर्तींना ५४० रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जेवढ्या रकमेची मूर्ती त्याप्रमाणात जीएसटी रकमेचा अतिरिक्त बोजा यंदा गणेशभक्तांना सहन करावा लागणार आहे.
मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मूर्तींमध्ये अगोदरच दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात जीएसटीमुळे रंग साहित्य, प्लॅस्टर आॅफ पॅरिस व अन्य साहित्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. मजुरीच्या दरात वाढ झाली असली तरी मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. सतत पडणारा पाऊस, त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला आहे. केवळ कलेची असलेली आवड जोपासण्यापुरताच हा व्यवसाय उरला असल्याची खंत कारखानदार अच्युत चव्हाण यांनी व्यक्त केली.
महागाईचा फटका
मुरुड तालुक्याच्या गावोगावी साठ ते सत्तर गणेश मूर्तिकारांच्या चित्रशाळा आहेत. माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना स्वत:सह कुटुंबीयांना सर्व कामे करावी लागतात.
चांगले कलाकार कामगार म्हणून मिळणे दुरापास्त झाले आहे. वाढत्या किमतीमुळे मूर्तींचा आकारही लहान झाला आहे. निरनिराळे देखावेही कमी झाले आहेत.
या सर्व कारणांमुळे कार्यशाळेत शाडूच्या मातीपासून बनविण्यात येणाºया मूर्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, या वाढत्या महागाईचा फटका गणेश भक्तांना सहन करावा लागत आहे. नेमकेच कारखानदार सध्या गणेशमूर्ती घडवण्याचे काम करीत आहे.
कोकणातील भक्तगण गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावाकडे परतत असून, मनोभावे गौरी- गणेशोत्सव साजरा केला जातो. महागाईची झळ बसली तरी भक्तांची श्रद्धा मात्र तसूभरही कमी झाली नसल्याचेही मूर्तिकार सांगतात.

Web Title: This year Ganesh idols will be able to meet GST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी