अडीच हजाराची लाच घेताना खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर रंगेहाथ ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 08:57 PM2017-11-21T20:57:42+5:302017-11-21T22:36:40+5:30

घरी पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन नळ जोडणी करुन देण्याकरीता 3 हजार 1०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन मंगळवारी संध्याकाळी खोपोली नगरपरिषदेच्या कार्यालयात 2 हजार 5०० रुपयांची लाच स्विकारताना खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर देवराम बाळकृष्ण मुके यास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

While taking a bribe of two and a half lakh, the Khopoli municipality council is in possession of the plaintiff | अडीच हजाराची लाच घेताना खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर रंगेहाथ ताब्यात

अडीच हजाराची लाच घेताना खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर रंगेहाथ ताब्यात

Next

खोपोली : घरी पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन नळ जोडणी करुन देण्याकरीता 3 हजार 1०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन मंगळवारी संध्याकाळी खोपोली नगरपरिषदेच्या कार्यालयात 2 हजार 5०० रुपयांची लाच स्विकारताना खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर देवराम बाळकृष्ण मुके यास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सूरु असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक किरणकूमार बकाले यांनी दिली आहे.

    तक्रारदार यांनी आपल्या घरी नळाने सुयोग्य पाणी पुरवठा होत नसल्याबाबत खोपोली नगरपरिषदेत तक्रार अर्ज दाखल केला होता. पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरिता आवश्यक नळ जोडणी करुन देण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचा प्लंबर देवराम बाळकृष्ण मुके याने गेल्या 18 नोव्हेंबर रोजी तक्रारदारांकडे 3 हजार 1०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. तक्रारीची खातरजमा करुन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक किरणकूमार बकाले, पो.ह.बी.सी.पाटील, पो.ना.जगदिश बोरे, पो.ना.विशाल शिर्के, महिला पो.ना.जागृती पाटील, पो.ना.विवेक खंडागळे व पो.शि.निशांत माळी या पथकाने सापळा रचून, तक्रारदारांकडून प्रत्यक्ष लाच घेताना प्लंबर देवराम बाळकृष्ण मुके यास ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: While taking a bribe of two and a half lakh, the Khopoli municipality council is in possession of the plaintiff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा