जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:24 PM2019-01-17T23:24:57+5:302019-01-17T23:25:21+5:30

रायगड जिल्हा परिषदेचा कार्यक्रम : खालापूर येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांचा सन्मान

Village child development centers will be started in the district | जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे सुरू करणार

जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे सुरू करणार

Next

अलिबाग/ मोहोपाडा : रायगड जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सक्षमीकरणाचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ११६ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून गरोदर महिला आणि नवजात बालकांना सकस आहार देण्यात येत असल्याने कुपोषण आटोक्यात येण्यास मदत झाली आहे असा दावा रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उमा मुंढे यांनी केला.


बुधवारी सकाळी खालापूर पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनीस तसेच जिल्ह्यात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सक्षम करण्याचे पाऊल जिल्हा परिषदेने उचलले आहे. किशोरवयीन मुली यांच्यासह गरीब गरजू आणि होतकरू महिलांना, बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण कामे हाती घेऊन त्यांची अंमलबजावणी देखील सुरू केल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.


यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जि. परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण, आरोग्य सभापती नरेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित होते.

रेणुका पाटील आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने सन्मानित
म्हसळा : सावित्रीबाई फुले जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्याने रायगड जिल्हा परिषदेचे वतीने दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रायगड जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार सेवेत उत्कृष्ट काम करणाºया म्हसळा खरगावखुर्द सकलप येथील रेणुका पाटील यांना प्रदान करण्यात आला.
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रायगड जिल्हा परिषदेत संपन्न झालेल्या कार्यक्र मात रेणुका पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्र माला राजिप उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण सभापती नारायण डामसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर,अधिकारी व पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. १९९४ मध्ये अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत झालेल्या रेणुका पाटील यांनी तालुक्यात तीव्र (सॅम) आणि अतितीव्र (मॅम)कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. रेणुका पाटील यांनी त्यांचे सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याने त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षीचा आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Village child development centers will be started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड