पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले, विवाह खर्च वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:57 AM2019-05-10T02:57:29+5:302019-05-10T07:03:40+5:30

रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे

Vegetable prices rise due to water scarcity, housewives' budget collapses, wedding expenses increase | पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले, विवाह खर्च वाढला

पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले, विवाह खर्च वाढला

- प्रदीप मोकल
वडखळ  - रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; परंतु पेण, वडखळ बाजारासह गावोगावच्या आठवडा बाजारात भाजीपाल्याची आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाव वाढले आहेत, यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे तर लग्न समारंभाच्या खर्चात वाढ झाली आहे.
सध्या बाजारात वांगी ७० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, टोमॅटो ५० रुपये किलो, मटार ८० रुपये किलो, मिरची ७० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो, फरसबी ६० रुपये किलो, कोथिंबीर जुडी ५० रुपये, मेथी जुडी २५ ते ३० रुपये तर फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. विहिरी कूपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची खालावली असून नवीन कूपनलिका खोदताना सुमारे ३०० फुटांपर्यंत पाणी लागत नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील स्थानिक भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे.

पेण, वडखळ बाजारात पुणे, चाकण येथून भाजीपाला विक्रीस येत आहे; परंतु तेथून येणाºया भाजीपाल्याची आवकही मंदावली असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
- विक्रांत पाटील, भाजी विक्रेता

बाजारात भाज्याचे दर वाढले असल्याने महिन्याचा खर्च तर वाढलाच आहे तर लग्न समारंभाच्या खर्चात वाढ झाली आहे.
- देवेंद्र पाटील, ग्राहक

Web Title: Vegetable prices rise due to water scarcity, housewives' budget collapses, wedding expenses increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.