सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:21 AM2018-04-19T01:21:40+5:302018-04-19T01:21:40+5:30

धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे.

Unity among the people can be attributed to the cosmicists - Sunil Tatkare | सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

Next

दांडगुरी : देशाला महासत्ता महासत्ता बनवण्यासाठी सर्वधर्मीय जनतेने एकत्रित येण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केले.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे मंगळवारी सर्वधर्म समभाव मेळाव्यात ते बोलत होते. तटकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, त्यांच्या विचारांची परिपूर्तता पुढच्या पिढीत होणे आवश्यक आहे. भगवान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना करत असताना अहिंसेचा विचार त्या वेळी दिला. गौतम बुद्धांनीदेखील अहिंसेचा संदेश देत शांततेचा मार्ग कशाप्रकारे देशात प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला. आज त्याच विचारांची गरज असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे, असे तटकरेंनी सांगितले.
कार्यक्र मात महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली. राजकारण बाजूला ठेवत सर्वधर्म समभाव कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक राष्ट्रीय विश्वशांतीदूत व जमियते उल्मादेहिंद चे अध्यक्ष सय्यद अर्षद मदनी यांनी विश्वशांतीचा संदेश दिला. मध्यप्रदेश येथील विश्वहिंदू सत्यशोधक मिशन आचार्य शंकराचार्य सत्यानंदजी महाराज, मातंगगड आश्रमचे आचार्य महंत बाबास्वामी सत्यानंदासजी यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून देशात शांतता व देशाची एकता आबाधित राखण्यासाठी विविध उदाहरणे देत उपस्थितांना प्रबोधित केले. महंमद मेमन, निवास गाणेकर, रमेश घरत, सुकुमार तोडलेकर, झोलके पाटील, गणेश पाटील, उदय बापट, अविनाश कोलबेकर, अफजल मेमन, शंकर गाणेकर, एजाज हवालदार, मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
बोर्ली पंचतन व म्हसळा येथील आमरते शिरया हलका आणि अंजुमन दर्दमंदान तालीम व तरक्की यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात यशस्वीपणे पार पडला. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव पवार व दिघी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Unity among the people can be attributed to the cosmicists - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.