चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 03:48 PM2018-05-03T15:48:22+5:302018-05-03T15:48:22+5:30

जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात.

The tribal children 'organization is ready for global biodiversity awareness in the Western Ghats | चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

Next

- जयंत धुळप 

अलिबाग - जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समुह राहतात. आपला हा नैसर्गीक वारसा आपल्या आयूष्याकरीता आपणच जोपासायला हवा, या हेतूने महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील आदिवासी मुले या वारसा जतनाकरिता सज्ज झाली असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

पश्चिम घाटातील ठासळत्या नैसर्गिक संतुलनाचा विपरित परिणाम

जैवविविधतेच्या दृष्ट्रीने अत्यंतिक संवेदनशील अशा या पश्चिम घाटात कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड येथील अनेक आदिवासी व बिगरआदिवासी गाव समूहांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील खाणी, अभयारण्याच्या सभोवताली झालेली वृक्षतोड, परंपरागत जंगलनिवासींची बदललेली शेती पद्धती व वन्य प्राण्यांची शिकार या सारख्या अनेक बाबींमुळे पश्चिम घाटातील नैसर्गिक संतुलन  वेगाने ढासळत आहे. यांचाच विपरित परिणाम म्हणून भूस्सखलन,  महापूर,  अतिवृष्टी तसेच दुष्काळ आदींसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले.

‘पश्चिम घाट वाचवा’अभियानामार्फत 62 मुलांना प्रशिक्षण

  याच ठासळत्या नैसर्गिक संतुलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील होश्यागडी येथील जंगलात ‘पश्चिम घाट वाचवा’ या अभियानामार्फत दि. 25 ते 29 एप्रिल 2क्18 या दरम्यान किशोरवयीन मुला-मुलींचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या  शिबिरात एन्वायरमेंटल स्टडी सेंटर व प्रकृती या दोन संस्थांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी राज्यातील एकूण 62 मुले व मुली सहभागी झाल्याचे त्यांनी सांगीतले.

 

कोकणातील 16 आदिवासी मुलांचा सक्रीय सहभाग

कोकणातून अंकुर ट्रस्ट या संस्थेमार्फत आदिवासी, धनगर तर चाईल्ड हेवन येथील निराश्रीत मुले असे एकूण 16 किशोरवयीन मुलांचा चमू  व कर्मचारी सनिश म्हात्ने,  संजय नाईक तसेच गटप्रमुख ईला गोरे व गार्गी पाटील आदी सहभागी झाले होते. कर्नाटकातून आलेल्या या प्रशिक्षित मुलांनी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणा बाबत संपुर्ण माहिती येथे देवून, हा जैवविधतेचा वारसा जतन करण्याकरिता सक्रीय होण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगीतले. 

62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धिंगत करणार

 पश्चिम घाट वाचवा या अभियानातील आपले भावी संकल्प देखील या मुलांनी तयार केले असून महाराष्ट्र,  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील या 62 आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धीगत करण्याचा त्यांचा संकल्प महत्वपूर्ण असल्याचे डॉ.पाटील यांनी अखेरीस सांगितले.

Web Title: The tribal children 'organization is ready for global biodiversity awareness in the Western Ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.