ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:17 PM2019-02-23T23:17:15+5:302019-02-23T23:17:29+5:30

भरारी पथकांसह कडक पोलीस बंदोबस्त : सरपंचपदासह एक हजार ८५७ उमेदवार रिंगणात

Today's poll for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Next

अलिबाग : जिल्ह्यातील एकू ण ७९ ग्रामपंचायतींसाठी रविवार, २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. थेट सरपंचपदासाठी २२६ तर सदस्यपदासाठी एक हजार ६३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जिल्हाभरात ३१४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी मतदान यंत्रे घेऊन अधिकारी व कर्मचारी शनिवारी दुपारी संबंधित मतदान केंद्रांवर दाखल झाले. मतदान यंत्रांची तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ७९ ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. ७९ पैकी एका ग्रामपंचायतीत सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने सरपंचपदासाठी ७८ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या ७८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी २२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर ७९ ग्रामपंचायतींच्या ७११ सदस्यपदाच्या जागांसाठी एक हजार ६३१ उमेदवार रिंगणात आहेत.


जिल्ह्यातील ग्र्रामपंचायतींत आपल्याच पक्षाची सत्ता यावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचार केला होता. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापलेले वातावरण शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर आता शांत झाले. आदल्या रात्रीच्या घरोघरच्या मतदार भेटींना वेग आला.


१५७ पोलीस बंदोबस्तासाठी रवाना
च्रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी होणारे मतदान व सोमवारी होणारी मतमोजणी या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार वा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने ज्या पोलीस स्टेशन हद्दीत निवडणूक पार पडणार आहे, त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रायगड पोलीस मुख्यालयातून पोलीस स्टेशननिहाय १५७ पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

चौलमध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
च्रेवदंडा : चौल ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर आता शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. रविवार, २४ फेब्रुवारी रोजी होणाºया निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कर्मचाºयांची वर्दळ दिसून आली.

सोनारीत जोरदार लढत
उरण : उरणमधील सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी होत आहे. सरपंच एक तर तीन प्रभागांतून नऊ अशा एकूण दहा जागांसाठी निवडणुकीत २० उमेदवार रिंगणात आहेत. कोणाच्या पारड्यात मतदारराजा मत टाकतो, हे सोमवार, २५ फे ब्रुवारीला निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

३१४ मतदान केंद्रांवर होणार मतदान
च्७९ ग्रामपंचायतींसाठी ३१४ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. या केंद्रांवर ३५६ मतदान यंत्रांच्या माध्यमातून मतदान घेण्यात येईल. मतदानांती मतदान यंत्रे संध्याकाळी संबंधित तहसील कार्यालय वा मतमोजणी केंद्रावर आणण्यात येतील. सोमवार, २५ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

Web Title: Today's poll for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.