मित्रासाठी मंत्रिपद ठोकरणारा आमदार, आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:05 AM2017-12-26T03:05:34+5:302017-12-26T03:05:42+5:30

कर्जत : एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही.

Thousandara MLA and MLA Suresh Lad, a concurrent function for the friend | मित्रासाठी मंत्रिपद ठोकरणारा आमदार, आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी सोहळा

मित्रासाठी मंत्रिपद ठोकरणारा आमदार, आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी सोहळा

Next

कर्जत : एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही. या मतदारसंघात असलेले अनेक कारखाने बंद पडले आहेत. अनेक कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम अजून मिळालेली नाही. या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी लाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्यांशी संपर्क साधला तर मी तुमच्यासोबत असेल.

शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आक्र मक होतात हे सर्वांनी पाहिले आहे. तसेच मित्रासाठी मंत्रिपद ठोकरणारा आमदार म्हणजे लाड यांचे कौतुक करावे लागेल. त्यांनी माजी आमदार बी. एल. पाटील आणि वसंतराव राऊत यांची परंपरा सुरेश लाड सांभाळीत असून त्यांना सर्वांची साथ मिळत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

आमदार सुरेश लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी निमित्त सत्कार आणि कृतार्थ या गौरव अंकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दहिवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचीच्या मैदानावर करण्यात आले होते. याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, माजी मंत्री गणेश नाईक,शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार धर्यशील पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार संजय (बाळा) भेगडे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार बाळाराम पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार गोटीराम पवार, माजी आमदार देवेंद्र साटम, कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाई, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार सुरेश लाड यांनी मी जेव्हा समाजकारणाबरोबरच राजकारणात आलो. त्यावेळी आमदारकीपर्यंत जायचे ठरवले नव्हते परंतु मी पक्षाने दिलेली जबाबदारी नेकीने पार पाडली. दिले त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले. असे सांगून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, सभापती आणि नंतर आमदार पदापर्यंतचा प्रवास दिलखुलासपणे सांगितला. सुनील तटकरे यांनी नेहमीच सर्वच बाबतीत अत्यंत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले आणि १९९९ मध्ये शरद पवारांच्या परिस स्पर्शाने मी पावन झालो असे सांगण्यास आमदार सुरेश लाड विसरले नाहीत.
सतत चार वेळा सुरेश लाड यांच्या विरु द्ध लढलेले माजी आमदार देवेंद्र साटम यांनी आपल्या मनोगतात आमदार लाड म्हणजे एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. जय पराजय होतच असतो मात्र आमची मैत्री अजूनही तशीच राहिली आहे. लाड यांच्या कडून बरेच काही शिकायचे आहे असे स्पष्टपणे सांगितले. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काम करणारा माणूस अशी सुरेश लाड यांची प्रतिमा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नितीन आरेकर आणि समीरा गुर्जर यांनी केले.याप्रसंगी विविध पक्षाचे कार्यकर्ते, संस्थाचे पदाधिकारी, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Thousandara MLA and MLA Suresh Lad, a concurrent function for the friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड