अलिबागमध्ये शिवशाही बसची साध्या बसला बेदरकार धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:42 AM2018-06-28T10:42:24+5:302018-06-28T10:44:17+5:30

अलिबाग जवळच्या कार्लेखिंड घाटात शिवशाही बसने एका मिनीडाेर रिक्षाला ओव्हरटेक करुन समाेरुन येणाऱ्या साध्या एसटी बसला जाेरदार धडक दिली.

A simple bus of Shivshahi bus stands in Alibaug | अलिबागमध्ये शिवशाही बसची साध्या बसला बेदरकार धडक

अलिबागमध्ये शिवशाही बसची साध्या बसला बेदरकार धडक

- जयंत धुळप

अलिबाग : अलिबाग जवळच्या कार्लेखिंड घाटात शिवशाही बसने एका मिनीडाेर रिक्षाला ओव्हरटेक करुन समाेरुन येणाऱ्या साध्या एसटी बसला जाेरदार धडक दिली. या अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून  35 प्रवासी जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. 

कार्लेखिंड घाटात मुरुड-स्वारगेट शिवशाही बस (क्र.MH04-GD8739) ही समाेरुन येणाऱ्या पनवेल-अलिबाग या साध्या एसटी बसला ( क्र.MH14-BL-1877) जाऊन धडकली. त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर, या अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 35 प्रवासी जखमी झाल्याचे रायगड जिल्हा वाहतुक पाेलीस विभाग प्रमुख सुरेश वराडे यांनी सांगितले. 

दरम्यान, सर्व जखमींना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: A simple bus of Shivshahi bus stands in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.