शिवशाहीचा चालक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:41 PM2018-10-18T23:41:00+5:302018-10-18T23:41:09+5:30

दासगाव : ठाणे येथून गुहागरला जाणाऱ्या शिवशाही बसचा चालक महाड स्थानकात आला असता झोप अनावर झाल्याने झोपला. त्याला उठवण्यास ...

Shivshahi's driver is in police custody | शिवशाहीचा चालक पोलिसांच्या ताब्यात

शिवशाहीचा चालक पोलिसांच्या ताब्यात

Next

दासगाव : ठाणे येथून गुहागरला जाणाऱ्या शिवशाही बसचा चालक महाड स्थानकात आला असता झोप अनावर झाल्याने झोपला. त्याला उठवण्यास गेलेल्या वाहतूक नियंत्रकाला त्याने शिवीगाळ केली. बस चालवतानाही तो डुलक्या देत होता. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाºया चालकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवारी मध्यरात्री ठाणे-गुहागर ही शिवशाही बस महाड स्थानकात रात्री १.४५ वाजता आली असता, बसचा चालक अविनाश अशोक मोरे याने गाडी पुढे न नेता सरळ झोप काढण्यास सुरुवात केली. वाहकाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही. या वेळी वाहतूक नियंत्रकांनी देखील उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे वाहतूक नियंत्रकांनी पोलिसांना बोलावून घेतले. महाड शहर पोलिसांनी या मद्यधुंद चालकास ताब्यात घेतले आहे. सदर चालकाची ब्रीथ अ‍ॅनालायझर मशिनने तपासणी केली असता तो नशेत असल्याचे महाड शहर पोलीस संदेश नाईक यांनी सांगितले.
ठाणे-गुहागर बसमध्ये २२ प्रवासी होते. रात्री हा प्रकार घडल्याने प्रवासी देखील भयभीत झाले. या प्रवाशांना महाड आगाराच्या बसमधून पुढे रवाना केले असल्याचे वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी सांगितले.

Web Title: Shivshahi's driver is in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.