महाडमध्ये शिवसेनेचे २१, काँग्रेसचे २० सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:51 AM2017-10-18T06:51:35+5:302017-10-18T06:53:20+5:30

महाड : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे, २० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत.

 Shivsena's 21, Congress's 20 sarpanchs in Mahad | महाडमध्ये शिवसेनेचे २१, काँग्रेसचे २० सरपंच

महाडमध्ये शिवसेनेचे २१, काँग्रेसचे २० सरपंच

Next
ठळक मुद्देMahad

महाड : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे, २० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेस - भाजपा आघाडीचे, एका जागेवर काँग्रेस - शिवसेना आघाडीचा तर तीन ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात काँग्रेसने प्रथमच जोरदार मुसंडी मारली आहे.
मंगळवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले सरपंच : गांधारपाले- रेहाना सोलकर, आदिस्ते - मीनाक्षी खिडबिडे, आंबावडे - नेहा चव्हाण, किंजळघर - शरद आंबावले, नाते - अशोक खातू, गोठे बु. - प्रकाश गोलांबडे, कांबळे तर्फे बिरवाडी - सरोज देशमुख, ताम्हाणे- सुनील बोरेकर, साकडी - नीलेश सालेकर, दादली - सुमीत तुपट, कोल - उषा धोंडगे, धामणे -उषा पवार, सवाणे - संदेश बोबडे, वाघोली (सरपंच बिनविरोध, निवडणुकीत बहुमत), आचळोली - विकी पालांडे, जुई बुद्रुक - मीनाझ करबेलकर, कावळे तर्फे विन्हेरे - प्रतीक येरूणकर, करंजखोल - अशोक पोटसुरे, लाडवली- कृष्णा शिंदे, केंबुर्ली- सादिक घोले.
शिवसेनेचे निवडून आलेले सरपंच : दासगाव - दिलीप ऊर्फ सोन्या उकीर्डे, कोथेरी - नथू दिवेकर, नडगाव तर्फे तुडील - रजनी बैकर, बिजघर - मनोहर खोपटकर, गोडाळे - सुरेखा महाडिक, आडी- विलास चव्हाण, शिरवली - अशोक सकपाळ, वीर - (सरपंच बिनविरोध, निवडणुकीत बहुमत), नांदगांव बुद्रुक - मोहन रेशिम, वामने - प्रवीण साळवी, कुसगांव - गंगुबाई कदम, नातोंडी - समीर नगरकर, सावरट - निर्मला पिसाळ, उंदेरी - शीतल कासार, वरंध - संगीता सकपाळ, कोळोसे - वनिता खेडेकर, खुटील - राजेश सुकुम, वारंगी - सिध्दी धुमाळ, वहूर - जितेंद्र बैकर, नागांव - चंद्रकांत उतेकर, करंजाडी - शर्मिला किलजे.
भारतीय जनता पक्षानेही या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाड तालुक्यात आपले पाय रोवले आहेत. भाजपा-काँग्रेस आघाडी चिंभावे ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले असून, येथे भाजपाच्या प्राजक्ता दळवी या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. तर रानवडी ग्रमपंचायतीमध्येही भाजपा-काँग्रेस आघाडीने विजय संपादन केला असून, येथे किसन मालुसरे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. सेना-काँग्रेस आघाडीने अप्पर तुडील ग्रामपंचायतीमध्ये यश संपादन केले असून, येथे शिवसेनेचे इनायत देशमुख हे निवडून आले आहेत. शिरगांव ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार सचिन ओझर्डे, नडगांव तर्फे बिरवाडी अपक्ष उमेदवार संजय देशमुख तर कुर्ले ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार सचिन पवार हे निवडून आले आहेत.
महाड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी २६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेतली.

पोलादपुरात शिवसेनेची सरशी

पोलादपूर : तालुक्यात १६ आॅक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल १७ आॅक्टोबर रोजी जाहीर झाले असून पोलादपुरात एकूण १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर एकूण ६ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली, तर उर्वरित १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळवारी निकाल घोषित करण्यात आला.
शिवसेनेने १६ पैकी ११ ग्रा. पं. वर भगवा फडकवत वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये उमरठ, बोरघर, कालवली, कापडे खुर्द, परसुळे, पैठण, चांभारवणी, कोतवाल खुर्द, दिविल लोहारे, गोळेगणी या ग्रामपंचायतींचा सामावेश आहे. भोगाव, धामणदेवी, ओंबळी या तीन ग्रा. पं. वर काँग्रेसने आपले वर्चव सिद्ध केले आहे. तर पार्ले ग्रा. पं. बिनविरोध निवड करून भाजपाने आपल्या ताब्यात घेतली असून कोतवाल बु. ग्रा. पं. मध्ये शिवसेना-भाजपा युती करून ही ग्रा.पं. भाजपाने जिंकून पोलादपुरात खाते उघडले आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोतवाल ग्रा.पं. निवडणुकीत महेश दरेकर यांचा अवघ्या ६ मतांनी पराभव झाला असला तरी काँग्रेसचे महेश दरेकर यांच्या नेतृत्वाखाली यांचे कोतवाल बु. वरील वर्चस्व असल्याचे दिसून येते.


 

 

 

Web Title:  Shivsena's 21, Congress's 20 sarpanchs in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.