जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:56 PM2019-01-28T23:56:48+5:302019-01-29T00:21:43+5:30

भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे.

Shipping Lines of JNPCT to Gujarat | जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

Next

- मधुकर ठाकूर 

उरण : भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे. ही अधोगती बाजारपेठेतील परिस्थितीमुळे नसून गुजरातच्या बंदरांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सहकार्याचे हे परिणाम आहेत. जास्तीत-जास्त कार्गो (मालवाहतूक) ही जेएनपीटीकडून मुंद्रा या गुजरातेतील बंदरावर वळवण्यात आली आहे. २०१८ च्या १, २ आणि ३ नोटिफिकेशन्समधून परदेशी कंटेनर्सचा परवाना शिपिंग कंपन्यांतर्फे गुजरातमधून केला आहे.

एमएससी मेडिटेरॅनियन शिपिंग आणि वर्षाकाठी सुमारे तीन लाख कंटेनर मालाची वाहतूक करणारी हुण्डाई कंपनीने यापूर्वीच मालवाहतूक सेवा जेएनपीसीटीकडून मुंद्रा आणि अन्य बंदरांंकडे वळवल्या आहेत. त्यामुळे दरमहा कोट्यवधींचे नुकसान जेएनपीटीला सहन करावे लागत आहे.

गुजरातस्थित बंदरांवर सागरी वाहतूक वळवल्यामुळे जेएनपीटी परिसरातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकºयांवर गदा येण्याची शक्यता आहे. जेएनपीसीटीमध्ये नवीन रोजगार संधीही यापुढे उपलब्ध होणार नसल्याची खंत कामगार आणि काही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.

अदानी बंदरांच्या उदयामुळे (मुंद्रा, हाजिरा आणि दहेज) जेएनपीसीटीचे महत्त्व कमी होत चालले आहे. या उलट, गुजरातस्थित बंदरांवर रोजगार संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या असून सहायक सरकारी धोरणांमुळे हे घडत आहे. गेल्या काही वर्षांत मोठे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले असल्याचाही हा परिणाम आहे. भारतातील परदेशी कंपन्यांसाठी अंतर्गत नेव्हिगेशन उघडण्याच्या शिपिंग धोरणात अलीकडेच झालेल्या बदलांनी या वाढत्या ट्रेण्डला आणखी पाठबळ मिळाले. यामुळेच जेएनपीटी बंदरावर गंडांतर येऊ लागल्याचा आरोपही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून होत आहे.

गुजरातमधील अदानी बंदराला झुकते माप दिल्यामुळे, तेथील व्यवसाय वाढला असून महाराष्ट्रातील व्यवसाय ठप्प होत आहे. परिणामी रोजगार निर्मितीही गुजरातमध्ये होत आहे. महाराष्ट्र राज्य सागरी हद्दीतले महत्त्वाचे केंद्र आहे. कोकणातील तरुण गेली कित्येक पिढ्या सागरी व्यापारी नौकांवर कार्यरत असल्याची प्रतिक्रिया एका स्थानिक नेत्याने यावेळी दिली. भारतीय शिपिंग कंपन्यांसाठी मालवाहनाच्या धोरणांत घट करण्यात आली आहे. मात्र अदानी आणि गुजरातच्या पथ्यावर पडेल, अशीच धोरणे नव्याने आखण्यात येत असल्याची माहिती शिपिंग उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. काही शिपिंग कंपन्यांंनी कंटेनर वाहतूक जेएनपीसीटी बंदरातून जेएनपीटीअंतर्गत असलेल्या इतर खासगी बंदरांकडे वळवली असली तरी रॉयल्टीतून मिळणाºया उत्पादनाचा फायदा जेएनपीटीलाच होणार आहे.

जेएनपीटीने डिसेंबर २०१८ मध्ये ४.४५ लाख टीईयूएस इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराचा व्यवसाय कमी झाला नसून वाढतच चालला असल्याचा दावा जेएनपीटीने केला आहे. मात्र कंटेनर हाताळणीच्या विलंबामुळे जेएनपीसीटीच्या अनेक शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे वळू लागल्याच्या प्रश्नावर जेएनपीटीकडून मौन पाळले आहे. जेएनपीसीटी सोडून काही शिपिंग कंपन्यांंची मालवाहू जहाजे जेएनपीटीअंतर्गत असलेल्या खासगी बंदरांकडे जाण्याने जेएनपीटीला रॉयल्टी मिळत असली तरी त्यामुळे कामगारांचे काम कमी होऊ लागले आहे. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप जेएनपीटी कामगारांकडून केला जात आहे.

Web Title: Shipping Lines of JNPCT to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.