दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:18 PM2019-02-01T23:18:12+5:302019-02-01T23:18:27+5:30

खंडित इंटरनेट सेवेचा फटका

Service office at the post office in Dasgaon | दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

Next

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावातील पोस्ट कार्यालय गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधेमुळे त्रस्त आहे. चौपदरीकरण कामात वारंवार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची लाइन तुटत असल्याचे कारण दिले जात असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहक देखील हैराण झाले आहेत. याबाबत कठोर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

महाडजवळील दासगाव हे एक मुख्य गाव आहे. या गावात असलेल्या पोस्ट कार्यालयातील सुविधेचा परिसरातील गावांना फायदा होत आहे. टपाल पाठवणे, आर्थिक गुंतवणूक, विमा काढणे आदी सुविधा उपलब्ध असल्याने दासगाव पोस्ट कार्यालयात कायम गर्दी असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचे तीनतेरा वाजत आहेत. एकीकडे शासन सर्व व्यवहार आॅनलाइन पद्धतीने करण्याकडे आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडवला आहे. ग्रामीण भागात आणि सर्व शासकीय कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीचे नेट वापरले जाते. मात्र, शासनाच्या या इंटरनेट सुविधेचे महामार्ग चौपदरीकरण कामाने वाट लावली आहे. यामुळे आॅनलाइन कामे आॅफलाइन झाली आहेत.

दासगावमधील टपाल कार्यालयात वीर, दाभोळ, कोकरे, दासगाव, सापे या गावातील लोकांची कामे होतात. टपाल सेवा, पासपोर्ट, बचत खात्यांचे व्यवहार आदी सुविधा खंडित इंटरनेटमुळे ठप्प झाली आहेत. याबाबत दासगाव टपाल कार्यालयाने वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, याकडे भारत संचार निगम लिमिटेडचे महाड कार्यालय दुर्लक्ष करत आहे. वारंवार तोडल्या जाणाºया लाइनबाबत साधी कारवाई देखील झालेली नाही. यामुळे दासगावमधील टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि टपाल कार्यालयात येणारे नागरिक देखील या सेवेने हैराण झाले आहेत. खेडोपाड्यातून येणारे नागरिक खंडित इंटरनेट सुविधेमुळे वारंवार फेºया मारत आहेत. टपाल कार्यालयात खासगी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ बीएसएनएलच्या लाइनवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, बीएसएनएलचे अधिकारी याबाबत गंभीरपणे कार्यवाही करत नाहीत.

महामार्ग कामात इंटरनेट सुविधा खंडित होत आहे. लवकरच याबाबत कार्यवाही करून इंटरनेट सुविधा पूर्ववत केली जाईल.
- बी.पी. रावत, जनरल मॅनेजर, बीएसएनएल
दासगाव टपाल कार्यालयात गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधा खंडित होत आहे, यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, टपाल ग्राहकांच्या संतापाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे
- के. आर. शिलवंत,
पोस्ट मास्तर, दासगाव

दासगावमधील बीएसएनएलचे एक्सचेंज वहूरमध्ये स्थलांतर केल्यापासून दासगावमध्ये इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे पोस्ट आॅफिसमधील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही सुविधा लवकर पूर्ववत न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरणार.
- दिलीप उकिर्डे,
सरपंच दासगाव

Web Title: Service office at the post office in Dasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.