एक्स्प्रेसवेवर अपघातांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:58 PM2019-06-19T23:58:16+5:302019-06-19T23:58:33+5:30

दोन दिवसांत चार अपघात; आठ जखमी; वाहनांचे मोठे नुकसान

Series of Accidental Accidents | एक्स्प्रेसवेवर अपघातांची मालिका

एक्स्प्रेसवेवर अपघातांची मालिका

Next

मोहोपाडा : तालुक्यात अपघाताचा सिलसिला सुरूच असून दोन दिवसात चार अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोधिवली गावच्या हद्दीत घडला. कारचालकाचा (एमएच- ०४ जेव्ही १०३१ ) ताबा सुटल्याने ती मुंबईकडील लेन सोडून दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या कारला ( एमएच २० ईएफ ५०००) धडकली. समोरून येणाºया कारमधील मयूर मधुकर चौधरी(२२),मीराबाई लक्ष्मण चौधरी, श्रेयस नंदलाल चौधरी, श्रुतिका नंदलाल चौधरी व मीनल राहुल चौधरी हे जखमी झाले. जखमींना एमजीएम रुग्णालय, कळंबोली येथे हलविण्यात आले. दुसरा अपघात मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग चारवर चौक गावानजीक झाला. ओमनी कार (एमएच ०६ टी ५९८३ ) ही राणासहार अश्पाअली चालवत असताना समोरून जाणाºया कंटेनरने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कार कंटेनरला धडकून दोघे किरकोळ जखमी झाले.

तिसरा अपघात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्यापुढे घडला. पंधरा प्रवासी घेवून पुणे ते राजस्थान निघालेली बस अनियंत्रित होवून पलटी झाली. या अपघातात बसमधील सखाराम एमराम चौधरी(३५)आणि पिंटू मुलाराम राठोड (२८,दोघे रा. पुणे) यांना जबर मार लागला तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले.

चौथा अपघात खोपोली पेण राज्यमार्गावर तांबाटी गावाचे हद्दीत घडला. खोपोलीच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणारी इको कार चालक ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. पेणच्या दिशेने जाणारी झायलो कार, इको आणि एक दुचाकी यांची ठोकर झाली.
सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. वावोशी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

Web Title: Series of Accidental Accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात