जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:34 AM2018-06-07T01:34:21+5:302018-06-07T01:34:21+5:30

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मोफत मिळणार आहेत. यात इयत्ता १ली ते ८वीच्या एकूण ३ हजार २७२ शाळांमधील २ लाख ७ हजार ८४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 School ready for students' admission; Free textbooks for more than two lakh students on the very first day | जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

googlenewsNext

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मोफत मिळणार आहेत. यात इयत्ता १ली ते ८वीच्या एकूण ३ हजार २७२ शाळांमधील २ लाख ७ हजार ८४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना १५ जून रोजी ११ लाख २६ हजार १५६ पाठ्यपुस्तके मोफत देणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
बालभारती भांडारातून रायगडमधील या सर्व शाळांकरिता आवश्यक पाठ्यपुस्तके जिल्ह्यास प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ३७४ शाळा महाड तालुक्यात असून या शाळांतील १४ हजार २४८ विद्यार्थ्यांना ७८ हजार ३८३ पुस्तकांचे वितरण करण्यात येईल.
उर्वरित तालुक्यांत अलिबागमधील २५१ शाळांच्या १५ हजार ८८१ विद्यार्थ्यांना ८६ हजार ४९८, पेणमधील २७५ शाळांच्या १७ हजार ३०६ विद्यार्थ्यांना ९३ हजार १७, पनवेलमधील ३४५ शाळांच्या ५१हजार ६१ विद्यार्थ्यांना २ लाख ७७ हजार ३२९, उरणमधील ८० शाळांच्या १० हजार ९२९ विद्यार्थ्यांना ५६ हजार १५४, कर्जतमधील ३१७ शाळांच्या २१ हजार १२० विद्यार्थ्यांना १ लाख १४ हजार ९८०, खालापूरमधील २२८ शाळांच्या १५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना ८४ हजार ९७७, सुधागडमधील १७३ शाळांच्या ९ हजार ३०९ विद्यार्थ्यांना ५० हजार १०९, रोहामधील २८५ शाळांच्या १२ हजार ८९९ विद्यार्थ्यांना ६९ हजार २७८, माणगावमधील ३२६ शाळांच्या १४ हजार २४८ विद्यार्थ्यांना ७८ हजार ३८३, महाडमधील ३७४ शाळांच्या १४ हजार ३०० विद्यार्थ्यांना ७७ हजार ६७५, पोलादपूरमधील १५७ शाळांच्या ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांना २१ हजार ३६९, म्हसळामधील १२२ शाळांच्या ५ हजार १८४ विद्यार्थ्यांना २९ हजार १७२, श्रीवर्धनमधील १२३ शाळांच्या ६ हजार ९३१ विद्यार्थ्यांना ३७ हजार ८७९, मुरुडमधील ११३ शाळांच्या ५ हजार ६७४ विद्यार्थ्यांना ३१ हजार १५०, तळामधील १०२ शाळांच्या ३ हजार २६९ विद्यार्थ्यांना १८ हजार ८६ पाठ्यपुस्तके वितरित करण्याकरिता नियोजन करण्यात आले असल्याचे दराडे यांनी अखेरीस सांगितले.

Web Title:  School ready for students' admission; Free textbooks for more than two lakh students on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा