माथेरानमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 03:11 AM2018-03-18T03:11:58+5:302018-03-18T03:11:58+5:30

माथेरानमध्ये २0१७ च्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी केले.

 A review meeting of Congress in Matheran | माथेरानमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

माथेरानमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

googlenewsNext

माथेरान : माथेरानमध्ये २0१७ च्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी केले.
माथेरान दौरादरम्यान माजी नगराध्यक्ष तथा कॉँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. त्यांनी महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती घेतली. जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. यात महिलांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे ठाकूर यांनी सांगितले.
मनोज खेडकर यांच्यासारखा नेता कर्जतमध्ये आहे. याशिवाय काँग्रेसचे एकमेव नगरसेवक शिवाजी शिंदे नगरपालिकेत प्रभावी काम करीत आहे. पुढील महिन्यात पुन्हा आढावा बैठकीसाठी माथेरानला येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मनोज खेडकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  A review meeting of Congress in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.