परतीच्या पावसाचा रायगडला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:03 PM2018-10-19T23:03:23+5:302018-10-19T23:04:21+5:30

५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील भात पीकाची नासाडी : तलाठी व कृषी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाअभावी नुकसानी पंचनामा करण्यात दिरंगाई

Returning rain hit Raigad district | परतीच्या पावसाचा रायगडला तडाखा

परतीच्या पावसाचा रायगडला तडाखा

Next

- जयंत धुळप 


अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेले चक्रिवादळ आणि गुरुवारी झालेल्या परतीच्या पावसासह सोसाट्याच्या वाºयांमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


शुक्रवारी म्हसळा येथे सर्वाधिक ३० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर अन्यत्र माणगाव -१२, पनवेल-२९, पोलादपूर-२२, रोहा-२१, श्रीवर्धन-१० तर तळा येथे ११ मि.मी. झालेल्या पावसान भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाकडे प्रत्यक्ष पंचनामाअंती उपलब्ध माहितीनुसार, महाड तालुक्यातील १८१ शेतकºयांच्या ५१.८४ हेक्टर, माणगाव तालुक्यात ११२ शेतकºयांच्या ४५ हेक्टर, अलिबाग तालुक्यात २०० शेतकºयांच्या १८१ हेक्टर, तर पेण तालुक्यात सर्वाधिक ८०० शेतकºयांच्या एक हजार ४८० हेक्टर भातशेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.


गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील चक्रिवादळात नेमक्या किती शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले, याची माहिती कृषी विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. तर शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाच्या नुकसानीची देखील नेमकी माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. महसूल विभागाचा प्रतिनिधी असणारा ‘तलाठी’ आणि कृषी विभागाचा कर्मचारी यांच्या संयुक्त समन्वयातून नुकसानी पंचनामा होत असतो. मात्र, तलाठी आणि कृषी कर्मचारी यांच्या समन्वयाअभावी पंचनामा होऊ शकला नसल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांमध्ये मोठी नाराजी दिसून आली.


भात पीक नुकसानाचा पंचनामा होत नाही, तोपर्यंत शेतातील पडलेले भात पीक शेतकºयांना कापून आणता येत नाही. पंचनाम्यांना उशीर होत असल्याने शेतात पडलेले भात पीक पाण्यात कुजून पीक नुकसानात वाढ होते. मात्र, त्याची नोंद पंचनाम्याच्या वेळी होत नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांना मोठा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती महाडमधील शेतकरी सदाशिव शिर्के यांनी दिली.
गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रिवादळात शेतातील उभे आणि दाणा भरण्याच्या अवस्थेतील भात पीक शेतात झोपले. त्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि विजयादशमीच्या दिवशी आलेल्या पावसात ते भात पीक पूर्णपणे भिजून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. यांची सरकार डबल नुकसानभरपाई देणार का, असा सवाल अलिबागमधील शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Returning rain hit Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस