चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:41 AM2018-06-14T04:41:16+5:302018-06-14T04:41:16+5:30

कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक होण्याच्या समस्येला आळा घालण्याकरिता...

Repair of Chary-Gopchari and Shahapur sea conservation bands | चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

Next

- जयंत धुळप
अलिबाग  - कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक होण्याच्या समस्येला आळा घालण्याकरिता, हे समुद्र संरक्षक बंधारे रोजगार हमी योजनेतून दुरुस्त करून स्थानिक ग्रामस्थांना त्यांच्याच गावात रोजगार आणि भातशेतीचे रक्षण असा दुहेरी हेतू साध्य करण्याकरिता समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेण्याचा, श्रमिक मुक्ती दलाच्या शहापूर, धेरंड गावांतील शेतकरी शिष्टमंडळास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेला शब्द वास्तवात उतरला आहे.
रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खारभूमी विकास विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेवून याबाबत विचार विनिमय करून संरक्षक बंधाºयांची कामे रोजगार हमी योजनेतून कशी घेता येतील याबाबत मार्गदर्शन केले होते. दरम्यान, गेल्या २६ मे २०१६ रोजी खारभूमी विकास विभागाने बोलावलेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी खाजगी खारभूमी योजनांच्या दुरुस्तीवर शासकीय निधी खर्च करता येत नाही म्हणून खाजगी खारभूमी योजनांची दुरुस्ती होत नाही. ३७ वर्षात या खाजगी खारभूमी योजनांच्या दुरुस्तीवर शासनाच्या खारभूमी विकास विभागाने एकही पैसा खर्च केलेला नाही, त्यामुळे फुटणारे संरक्षक बंधारे ग्रामस्थांना आपली भातशेती आणि घरे वाचविण्याकरिता स्वखर्चाने व स्वकष्टाने सामूहिक श्रमदानातून बांधावे लागतात. मात्र हे काम राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून केल्यास ग्रामस्थांना त्यांच्याच गावात रोजगार मिळेल आणि संरक्षण बंधारे देखील बांधून होतील असा प्रस्ताव मांडला होता.
कामे दृष्टिपथात
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांची राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉबकार्ड करुन घेण्याचे निर्देष संबंधित विभागास दिले होते. श्रमिक मुक्ती दलाने या संदर्भात ग्रामस्थ शेतकºयांशी संवाद साधून ग्रामस्थांची जॉबकार्ड तयार झाली आणि रोजगार हमीतून संरक्षक बंधाºयांची कामे दृष्टिपथात आली होती.
शासन निर्णयानुसार खारभूमी विकास विभागाची मंजुरी
अलिबाग तालुक्यातील चरी-गोपचरी खारभूमी योजना आणि मोठे शहापूर खारभूमी योजना या दोन योजनांतील संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करण्याकरिता शासन निर्णय-मग्रारोहयो-२०१०/रोहयो-१० दि.८जून२०१० या शासन निर्णयानुसार खारभूमी विकास विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार चरी-गोपचरी खारभूमी योजनेच्या २२ लाख रुपयांच्या तर मोठे शहापूर खारभूमी योजनेच्या कामास २२ लाख ६३ हजार ५७० रुपयांच्या खर्च अंदाजपत्रकास मंजुरी २१ मार्च २०१८ रोजी देण्यात आली.
६ लाख ६० हजार रुपये मजुरी
चरी-गोपचरी खारभूमी योजनेतील संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम सुरु होवून ९० टक्के पूर्ण झाले आहे तर उर्वरित १० टक्के काम येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मंजूर निधी २२ लाख रुपयांपैकी ४० टक्के रोजगार हमी मजुरी आणि ६० टक्के वाळूदगड व यंत्रसामग्री असे प्रमाण असल्याने २२ लाख रुपयांपैकी ४० टक्के म्हणजे सुमारे ६ लाख ६० हजार रुपये मजुरी काम केलेल्या जॉबकार्डधारक शेतकरी ग्रामस्थांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. योजनेच्या दुरुस्तीकरिता सरासरी १०० मजूर कार्यरत होते परिणामी एका शेतकºयास ६ हजार ६०० रुपये रोहयो मजुरी मिळणार आहे. हे काम १५ दिवस होते परिणामी एका मजुरास एक दिवसाची मजुरी किमान ४०० रुपये प्राप्त होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या किमान २००रुपये मजुरीपेक्षा ती अधिक असल्याने ग्रामस्थ शेतकºयांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
मोठे शहापूर खारभूमी योजनेकरिता निधी मंजूर
मोठे शहापूर खारभूमी योजनेकरिता देखील २२ लाख ६३ हजार ५७० रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेला २१ मार्च २०१८ रोजी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून संरक्षक बंधाºयांची कामे अल्पावधीत सुरु होत आहेत.
मोठे शहापूर गावातील ४० ग्रामस्थांची ४० नवीन जॉबकार्ड तयार झाली असून उर्वरित कार्ड तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी
दिली आहे.

अलिबागमध्ये १ हजार ५१५ तर पेणमध्ये ९९७ हेक्टर भातशेती होणार पुनर्प्रापित
अलिबाग तालुक्यांतील चरी-गोपचरी आणि मोठापाडा शहापूर खारभूमी योजनेप्रमाणेच उर्वरित हाशिवरे, रांजणखार-मांडवखार, कालवड, खातीवरा आणि सांबरी या पाच तर पेण तालुक्यांतील बोरी,पांडापूर,कासू,डोलवी आदि एकूण सात खारभूमी योजनांची कामे देखील रोजगार हमीतून होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
च्या कामांच्या पूर्ततेअंती अलिबाग तालुक्यांत १ हजार ५१५ हेक्टर तर पेण तालुक्यांत ९९७ हेक्टर भातशेती पुनर्प्रापित होणार आहे,ही मोठी जमेची बाजू असल्याचे भगत यांनी अखेरीस सांगितले.

Web Title: Repair of Chary-Gopchari and Shahapur sea conservation bands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.