महिलेस एचआयव्ही असल्याचे सांगून प्रसूतीस दिला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:46 AM2018-01-19T00:46:19+5:302018-01-19T00:46:22+5:30

आदिवासी गरोदर महिलेस प्रथमिक अरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी एचआयव्ही असल्याचे सांगून सेवा नाकारून आलिबाग येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला

Refuse to give the pregnancy by telling the woman to be HIV | महिलेस एचआयव्ही असल्याचे सांगून प्रसूतीस दिला नकार

महिलेस एचआयव्ही असल्याचे सांगून प्रसूतीस दिला नकार

Next

विनोद भोईर
पाली : आदिवासी गरोदर महिलेस प्रथमिक अरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी एचआयव्ही असल्याचे सांगून सेवा नाकारून आलिबाग येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या महिलेचे बाळंतपण तातडीचे असल्याने १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खासगी दवाखान्यात दाखल केले.
येथील डॉक्टरांनी बाळंतपणासाठी आवश्यक असणाºया सर्व चाचण्या पार पाडल्या. यामध्ये एचआयव्हीची चाचणी निगेटिव्ह आली व या महिलेचे बाळंतपण केले. तिला मुलगा झाला असून दोघेही सुखरूप असल्याने कुटुंबाचा मानसिक तणाव दूर झाला; परंतु प्राथमिक आरोग्यकेंद्रातील डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आदिवासी महिलेला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. या हलगर्जीपणाचा सुधागड तालुक्यातून संताप व्यक्त होत असून, संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
एचआयव्ही नसल्याचे निष्पन्न होऊन सुखरूप बाळंत झाल्याने अदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. या प्राथमिक आरोग्यकेंद्रावरून सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे. १८ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत वरील विषयासंदर्भात चर्चा होऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश भगत यांच्यावर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव केला. या घटनेबाबत पाली प्राथमिक आरोग्यकेंद्रातील डॉ. रमेश भगत यांच्याकडे विचारणा केली असता, या गरोदर महिलेची मी प्राथमिक तपासणी केली असता तिला एचआयव्ही असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले आहे व त्या मतावर मी ठाम आहे, असे सांगितले.

Web Title: Refuse to give the pregnancy by telling the woman to be HIV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.