रायगडमध्ये सहा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:29 AM2019-04-21T00:29:02+5:302019-04-21T00:29:27+5:30

नामसाधर्म्याचे उमेदवार आणि ‘नोटा’ची धास्ती सतावते उमेदवारांना

Raigad was hit with six people in a note! | रायगडमध्ये सहा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट!

रायगडमध्ये सहा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट!

Next

अलिबाग : गतवेळच्या निवडणुकीत २० हजार ३६२ मते नोटाची होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांना मिळालेली मते नऊ हजार ८४९ होती.

नामसाधर्म्याचा अपक्ष उमेदवार रिंगणात नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांना नऊ हजार ८४९ मते अधिक मिळाली असती आणि त्यांचा केवळ २ हजार ११० मतांनी निसटता पराभव झाला नसता. गतवेळचे विजयी उमेदवार शिवसेनेचे अनंत गीते यांचे मताधिक्य केवळ दोन हजार ११० होते, त्याच वेळी ‘नोटा’ची मते २० हजार ३६२ होती. यंदाच्या निवडणुकीत अनंत गीते यांच्या नामसाधर्म्याच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. मात्र, सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन अपक्ष तटकरे हे उमेदवार रिंगणात आहेत.

‘नोटा’ म्हणजे काय?
(यापैकी कुणीही नाही). जर इव्हीएम मशिनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.

7,90,246 मते दोन प्रमुख उमेदवारांना २०१४ मध्ये मिळाली. शिवसेनेचे अनंत गीते यांना ३,९६,१७८ तर राष्ट्रवादीचे सुनील दत्तात्रेय तटकरे यांना ३,९४,०६८ मते मिळाली होती.

Web Title: Raigad was hit with six people in a note!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.