विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद रायगडकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:04 PM2019-01-15T23:04:29+5:302019-01-15T23:04:46+5:30

पनवेल येथे आठवे जिल्हास्तरीय प्रदर्शन : १३२ बाल वैज्ञानिक सादर करणार प्रोजेक्ट

Raigad hosted the science exhibition | विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद रायगडकडे

विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद रायगडकडे

googlenewsNext

- आविष्कार देसाई 


अलिबाग : विज्ञानवादी युगातील युवा पिढीच्या टॅलेंटला व्यासपीठ मिळाल्यास देशभरात उत्कृष्ट वैज्ञानिक निर्माण होतील, असे भारताचे माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सांगितले होते. त्यांच्या या वाक्याने देशभरातील युवावर्गाला प्रेरणा मिळत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पार पडणाऱ्या आठव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील पाच, असे एकूण १३२ बाल वैज्ञानिक आपापले इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सादर करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेत अन्य जिल्ह्यांना मागे टाकत यजमानपद पटकावले आहे.


केंद्र सरकार पुरस्कृत करत असलेल्या इनस्पायर अ‍ॅवॉर्ड मानक योजनेंतर्गत देशभरातील विविध विभागांमध्ये जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. सहभाग घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. त्या जिल्ह्याला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद मिळते. १८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील सेंट विल्फर्ड महाविद्यालयामध्ये पार पडणाºया जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाचा मान रायगड जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.


या प्रदर्शनामध्ये प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होताना म्हणजे जून-जुलै महिन्यांत सुरुवात झाली होती. वैज्ञानिकांनी पाठवलेले प्रोजेक्ट खरेच इनोव्हेटिव्ह आहेत का? याचे परीक्षण तज्ज्ञांमार्फत करण्यात आले, त्यानुसार सर्वाधिक रायगड जिल्ह्यातील ४३, मुंबई आणि मुंबई उपनगर ४२, ठाणे ४२ आणि पुणे जिल्ह्यातील पाच अशा १३२ वैज्ञानिकांचा समावेश आहे.


केंद्र सरकाची ही योजना असल्यामुळे केंद्र सरकार एका वैज्ञानिकामागे १० हजार रुपये खर्च करते. त्यानुसार १३२ वैज्ञानिकांच्या बँक खात्यामध्ये तब्बल १३ लाख २० हजार रुपये आधीच वर्ग करण्यात आलेले आहेत. या दहा हजार रुपयांच्या माध्यमातून प्रतिकृती तयार करणे, प्रतिकृतीची ने-आण करण्यासाठी यासह अन्य खर्च अपेक्षित आहेत.

विज्ञान प्रदर्शनातील महत्त्वाचे प्रोजेक्ट
च्बायोगॅस प्लॅन्ट, कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यंत्र, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले मच्छर संरक्षक कवच, सुरक्षित टिकाऊ रस्ते, प्लॅस्टिकचे रस्ते, प्लॅस्टिक बॉटलचे टॉयलेट, स्मार्ट सिटी मॉडेल, महिलांचे रक्षण करणारी पर्स, घरगुती कचºयाच्या व्यवस्थापनासाठी गिरण, अंधांना उपयोगी पडणारी काठी, विजेचा वापर न करता पाणी उचलण्याचे तंत्र, मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास आॅटो लॉक सिस्टीम, वायुप्रदूषण रोखण्याचे अनोखे तंत्र यासह शेकडो प्रोजेक्टचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक बाल वैज्ञानिकांनी आपले प्रोजेक्ट पाठवले होते. त्यांचेच प्रोजेक्ट जास्त संख्येने पात्र ठरले, त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने वैज्ञानिक घडत असल्याचे दिसून येते. जिल्हास्तरावर एकूण वैज्ञानिकांच्या संख्येच्या ७.५ं टक्के प्रोजेक्ट राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर तेथून ते राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरवले जाणार आहेत. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाºया सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. ७.५ टक्के विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी, मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.े

Web Title: Raigad hosted the science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.