राहुल गांधी नवे पक्षाध्यक्ष; महाड काँग्रेसची रॅॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:40 AM2017-12-18T01:40:10+5:302017-12-18T01:40:22+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या आनंदापोटी महाडमध्ये काँग्रेस पक्षाने भव्य आनंदोत्सव मोटारसायकल रॅली काढून आपला आनंद व्यक्त करीत ‘झिंदाबाद झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद’ या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले होते. राहुल गांधीच्या रूपाने आजपासून देशात परिवर्तनाची लाट येईल, असा विश्वास या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केला.

 Rahul Gandhi new party president; Mahad Congress Rally | राहुल गांधी नवे पक्षाध्यक्ष; महाड काँग्रेसची रॅॅली

राहुल गांधी नवे पक्षाध्यक्ष; महाड काँग्रेसची रॅॅली

googlenewsNext

महाड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या आनंदापोटी महाडमध्ये काँग्रेस पक्षाने भव्य आनंदोत्सव मोटारसायकल रॅली काढून आपला आनंद व्यक्त करीत ‘झिंदाबाद झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद’ या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले होते. राहुल गांधीच्या रूपाने आजपासून देशात परिवर्तनाची लाट येईल, असा विश्वास या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केला.
देशात आणि राज्यात तीन वर्षांत या सरकारने काय दिवे लावले आहेत हे सर्वश्रुत असून, जनता या सगळ्याला कंटाळली असून, आता पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता देशात काँग्रेसचा झंझावात जनतेला दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत जे आमच्या नेत्यांना पप्पू म्हणून हिणवत होते आज त्याच पप्पूने दाढीवाल्या अप्पूला हैराण केल्याचे चित्र अख्ख्या देशासह जगाने पाहिले असल्याची खरमरीत टीका माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केली.
देशात व राज्यात जी अवस्था आहे त्याहीपेक्षा वाईट अवस्था महाड विधानसभा मतदार संघात आहे. नवसाला पावणाºया आमदाराने गेल्या आठ वर्षांत फक्त फिरण्याचे काम केले असल्याचा आरोप करीत विकास हा जसा देशात हरवला आहे, तसा आता महाडमध्ये दिसेनासा झाला असल्याचा टोलाही माणिक जगताप यांनी लगावला. येत्या नवीन वर्षात जनतेला अपेक्षित असलेला बदल करीत जनतेच्या सुख-दु:खात आपण सहभागी होणार असल्याचे माजी आमदार जगताप यांनी या वेळी सांगितले.

Web Title:  Rahul Gandhi new party president; Mahad Congress Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.