दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 07:01 AM2018-12-16T07:01:31+5:302018-12-16T07:02:05+5:30

बाजारपेठ नसल्याने हमी भाव नाही : विक्रमगडमधील शेतकरी वळतोय भाजीपाला पिकांकडे

Rabbi Trouble due to Drought Conditions | दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी अडचणीत

दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी अडचणीत

Next

राहुल वाडेकर

विक्रमगड : तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून, खरीप हंगामातील भातशेतीवरच अंबलबुन न राहाता रब्बी हंगामात कडधान्य आणि भाजीपाला लागवडीकडे वळलेला आहे. मात्र , गेल्या दोन चार
वर्षापासुन निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा त्यातच यंदाची दुष्काळी परिस्थिमुळे खरीप व त्याच बरोबर रब्बी हंगाम देखील अडचणी सापडला असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्रही घटणार असल्याची शक्यता शेती तज्ञांनी वर्तविली आहे़
तालुक्यात व परिसरात पारंपारिक भातशेतीला दुर सारत खरीप हंगामाची तूट निदान थोड्यफार प्रमाणात तरी भरुन काढण्याकरीता रब्बी हंगामात मेहनत घेतली जात आहे. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी पालेभाज्या पिकवण्यात गर्क असल्याचे दिसत आहे. भात, नाचणी ही मुख्य पिके पावसाच्या भरोशावर घेणारा शेतकरी आता थोडासा सजग झाला आहे़
पावसाळयात पेरणी, लावणी व अन्य मशागतीची कामे करुन भात कापणी आटोपली की, पुन्हा त्यांचे डोळे खरीप हंगामाकडे लागलेले असायचे़ कारण हा हंगामच त्याला जिवाभावाची साथ होती. मात्र, यंदा या खरीप हंगामाने दगा दिल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीमध्ये अडकलेला आहे़. त्यातच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठे अभावी योग्य असा हमी भाव देखील मिळत नाही़

गावठी भाजांना शहरी भागात मागणी
तालुक्यातील कावळे, शेलपाडा, विक्रमगड, माण, नागझरी, वसुरी, डोल्हारी, दादडे, तलवाडा, आंबीवली, कुंर्झे, आंबेघर या परिसरातून मोठया प्रमाणात रब्बी पिक घेतले जाते़ येथील जमीनीत कारली, दुधी, मिरची, गवार, वांगी, टॉमॅटो, कोबी, प्लॉवर, भेंडी, शिमला मिरची, चवळी, काकडी, माठ,भोपळा, मेथी, चवळी अशा आदी पालेभाज्या शेतकºयांसाठी नगदी पिक ठरत आहेत. या भाज्यांची विक्री गावात, मुख्य बाजारात तसेच शहराच्या ठिकाणी होत आहे.

मजुरांना मिळतोय रोजगार
पालेभाज्यांसाठी साखळी पध्दतीने नळाद्वारे, पाटारे ंिकंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे़ त्यामुळे मळ्यावर काम करणाºया स्त्री-पुरुषांना मजुरीही मिळत आहे़ . तसेच तयार झालेली ताजा भाजीपाल्याला शहतातील बाजारपेठांमध्ये चांगली मागणी अशी माहिती ओंदे येथील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांनी लोकमतला दिली.
 

Web Title: Rabbi Trouble due to Drought Conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड