मंडपात जाण्याआधी नवरदेवाने केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:23 AM2019-04-24T00:23:35+5:302019-04-24T00:23:56+5:30

लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य आहे, या भावनेतून एका नवरदेवाने मतदानासाठी राखीव वेळ काढून मतदान केले.

Polling done by Navarodhi before going to the Tent | मंडपात जाण्याआधी नवरदेवाने केले मतदान

मंडपात जाण्याआधी नवरदेवाने केले मतदान

Next

मुरुड : माणूस कितीही व्यस्त असला तरी जर त्याने ठरवले तर वेळात वेळ काढून कोणतेही काम करण्याची क्षमता माणसात असते. हे वेगवेगळ्या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. लग्न म्हटले की, खूप गडबड व उरकत्या कामांचा बोजवारा हा न संपणारा असतो; परंतु लग्नाच्या वेळीही लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य आहे, या भावनेतून एका नवरदेवाने मतदानासाठी राखीव वेळ काढून मतदान केले. मांडवात जाण्याआधी या नवरदेवाने आपला हक्क बजावला आणि मतदान हा आपल्याला घटनेने दिलेला पवित्र हक्क आहे आणि कितीही काम असेल तरी तो बजावणे गरजेचे आहे, असा संदेश दिला. नवरदेवाच्या मतदानाची मुरुडमध्ये सर्वत्र चर्चा होत असून प्रशंसा के ली जात आहे. मुरु ड शहरात मारु ती नाका परिसरात राहणारे कवळे कुटुंबीय आज मुलाचे लग्न असल्याने व्यस्त आहे. २३ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता लग्नाचा शुभमुहूर्त होता; परंतु मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यासाठी अशील अशोक कवळे या नवरदेवाने लग्नाच्या आधी कार्यक्रमातून वेळ काढत अगोदर घोड्यावर बसून लवाजमासह मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचे कर्तव्य बजावले.

Web Title: Polling done by Navarodhi before going to the Tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.