‘त्या’ आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:19 AM2018-03-16T05:19:48+5:302018-03-16T05:19:48+5:30

मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या विनेगाव येथील बेटर लाइफ व्यसनमुक्ती केंद्रातील अमानुष मारहाण व अत्याचारप्रकरणी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप भगवानदास पटेल, त्याचा मुलगा मल्हार पटेल यांच्यासह सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आली होती.

Police detain them till 17 March | ‘त्या’ आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

‘त्या’ आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Next

खालापूर : मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या विनेगाव येथील बेटर लाइफ व्यसनमुक्ती केंद्रातील अमानुष मारहाण व अत्याचारप्रकरणी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप भगवानदास पटेल, त्याचा मुलगा मल्हार पटेल यांच्यासह सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आली होती. खालापूर पोलिसांनी गुरुवारी सर्व आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
खालापूर विनेगाव येथील मोंटेरिया रिसॉर्टच्या बाजूला असणाºया कृष्णा माई या बंगल्यात मुंबईतील प्रदीप पटेल यांचे कुटुंबीय व्यसनमुक्ती केंद्र चालवतात. या केंद्रात व्यसन सोडवण्यासाठी आलेल्यांना अमानुष मारहाण, सिगारेटचे चटके देणे अशा प्रकारणे छळ करण्यात येत होता. या मारहाणीमुळे हनी नावाचा एक १३ वर्षीय मुलगा बेशुद्ध पडला. त्याची आई आलिषा तेथे मुलाला पाहायला गेली असता, हा प्रकार उघडकीस आला. तिच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली होती. यातील आरोपी प्रदीप पटेल आणि त्याचा मुलगा मल्हार पटेल यांच्यासह सहा आरोपींना गुरुवारी खालापूर पोलिसांनी स्थानिक न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
व्यसनमुक्ती केंद्रे रडारवर
अलिबाग येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात अशाच प्रकारे अमानुष मारहाण झाल्याचे काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते, तर चौकजवळील व्यसनमुक्ती केंद्रातदेखील यापूर्वी अशाच प्रकारे मारहाण व एकाची हत्या झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्यानंतर विनेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर आता जिल्ह्यातील सर्वच व्यसनमुक्ती केंद्रे पोलिसांच्या रडारवर आली आहेत. सर्वांचाच तपास करण्यात येणार असल्याचे समजते.
अधिक तपास सुरू
बेटर लाइफ व्यसनमुक्ती केंद्रातील मारहाण प्रकरणातील अटक आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. गरजेनुसार आणखीही काही जणांची चौकशी करण्यात येईल. परवानगी न घेताच हे केंद्र सुरू होते, असे खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी सांगितले.
>लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय
विनेगाव व्यसनमुक्ती केंद्रात पीडितांवर उपचार करताना देण्यात येणाºया औषधांची माहिती पोलीस घेत आहेत. घटनास्थळी काही संशयित औषधे पोलिसांना सापडली आहेत. या ठिकाणी लैंगिक अत्याचारही करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे खालापूर पोलिसांनी सांगितले; शिवाय आता या संस्थेच्या अन्य पदाधिकाºयांचीदेखील पोलीस चौकशी करणार आहेत.

Web Title: Police detain them till 17 March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.