पोलादपूरमध्ये एका रात्रीत ११ घरफोड्या, ६९ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:21 AM2017-10-20T06:21:03+5:302017-10-20T06:21:14+5:30

पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात मुंबई - गोवा महामार्गालगत असणाºया श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट व शगून अपार्टमेंट व अन्य ठिकाणी बुधवारी रात्री तब्बल ११ बंद घरांमध्ये चोरी झाली.

 In Poladpur, 11 house buffs and 69 thousand rupees in a night | पोलादपूरमध्ये एका रात्रीत ११ घरफोड्या, ६९ हजारांचा ऐवज लंपास

पोलादपूरमध्ये एका रात्रीत ११ घरफोड्या, ६९ हजारांचा ऐवज लंपास

Next

पोलादपूर : शहरातील प्रभातनगर परिसरात मुंबई - गोवा महामार्गालगत असणा-या श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट व शगून अपार्टमेंट व अन्य ठिकाणी बुधवारी रात्री तब्बल ११ बंद घरांमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून काही रहिवासी दिवाळीनिमित्त गावी गेले असून चोरीचा मुद्देमालाचा पूर्ण तपशील समजू शकला नाही. मात्र या चोरीच्या घटनेने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलादपूर शहरातील प्रभातनगर शगून अपार्टमेंट येथील रहिवासी हे गावी गेले असल्याने चोरट्यांनी त्यांचे बंद घरांचे कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश के ला. कपाट उघडून त्यातील सोन्याच्या तारेत गुंफलेले मनी, ३ अंगठ्या, ४८ लहान मनी, दीड ग्रॅम वजनाचे बदामी पान, सोन्याच्या दोन बांगड्या, दोन कानातील रिंग, कानातील २ टॉप, कर्णफुले आदी सोन्याचे दागिने लंपास केले
आहेत.
तसेच शगून अपार्टमेंटमधील रिना राठोड, सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील राहुल लंगोटे, नीलेश कुंभार, शरद थोरात, प्रकाश इंगवले, रामजानकी अपार्टमेंटमध्ील शीला शिंदे, उमेश जाधव, युवराज जाधव, पवार चाळ येथील अमित सावंत, नानास्मृती अपार्टमेंटमधील पुंडलिक मोरे तसेच रोहिदासनगर येथील मनोहर कापडेकर आदि लोकांच्या बंद घरांचे टाळे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. वरील सर्वजण दिवाळी सणानिमित्त गावी गेले आहेत.
या घटनेची माहिती समजताच सहा. पो. नि. प्रकाश पवार, उपनिरीक्षक अनिल अंधेरे, पीएसआय सकपाळ, पो. ना. नाना म्हात्रे, दीपक जाधव, शिरगावकर, शेख, पिंगळे, सावंत, सावंत, अमित सावंत, आर. एन. जाधव, महाडिक, एएसआय प्रकाश जंगम, मोहिते, सुवर्णा खाडे आदि पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामे करून वेगाने तपासाची सूत्रे फिरवली आहेत.
पोलादपूर शहरात गेल्या दोन वर्षापूर्वी शिवाजीनगर, सैनिक नगर, गाडीतळे व महाबळेश्वर राज्यमार्गावरील घरे व दुकाने फोडून चोरट्यांनी चोरीचा डल्ला मारला आहे. तसेच काही दिवसापूर्वी ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना घडली आहे. मात्र यापूर्वी झालेल्या काही चोºयांचा अद्याप छडा न लागल्याने आणि चोरट्यांनी पुन्हा शहरात चोरीचा मोर्चा वळविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणी
काही दिवसांपूर्वी ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना घडली आहे. मात्र यापूर्वी झालेल्या काही चोºयांचा अद्याप छडा न लागल्याने आणि चोरट्यांनी पुन्हा शहरात चोरीचा मोर्चा वळविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलादपूरमध्येऐन दिवाळी सणात बंद असणारी अकरा घरे फोडण्याची घटना घडल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून याबाबत पोलिसांकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title:  In Poladpur, 11 house buffs and 69 thousand rupees in a night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.