पर्सिसीन नेट फिशिंगचा फटका : मत्स्य विभागाकडून १३३ बोटींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:25 AM2018-02-26T01:25:38+5:302018-02-26T01:25:38+5:30

रायगड जिल्ह्यात एलईडी लाइटद्वारे पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया १३३ बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणा-यांमुळे छोट्या मासेमारी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे.

 Persecin net crash: Action by 133 boats from Fisheries Department | पर्सिसीन नेट फिशिंगचा फटका : मत्स्य विभागाकडून १३३ बोटींवर कारवाई

पर्सिसीन नेट फिशिंगचा फटका : मत्स्य विभागाकडून १३३ बोटींवर कारवाई

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यात एलईडी लाइटद्वारे पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया १३३ बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणा-यांमुळे छोट्या मासेमारी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे. या विरोधात जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांना तीव्र विरोध केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने याबाबत संबंधित प्रशासनाला आदेश दिले होते.
कें द्र आणि राज्य सरकारने एलईडी लाइट फिशिंगवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्र आंदोलन करतील त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा संतप्त इशारा अलिबाग, मुरु ड, रेवस, बोडणी, उरण यासह अन्य भागांतील मच्छीमार संस्था आणि संघटनांनी दिला होता. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मत्स्य विभागाचे उपायुक्त आणि भारतीय तटरक्षक दलाने घेतली.
रायगडच्या मत्स्य विभागाने १२ नॉटिकल माइलमध्ये एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया बोटींच्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये १३३ बोटमालकांचा समावेश आहे. मात्र, १२ नॉटिकल माइलच्या पुढील क्षेत्र हे तटरक्षक दलाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्यामार्फत झालेल्या कारवाईचा तपशील मिळाला नाही. १२ नॉटिकल माइलच्या पुढे
अशा पद्धतीने मासेमारी होत असल्याच्या तक्र ारी समोर येत असल्याने तटरक्षक दलाकडून कारवाई होते अथवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंगच्या बोटींच्या खोल समुद्रातील मच्छीमारीमुळे किनाºयापासून १२ नॉटिकल माइल्स समुद्र क्षेत्रात मासळीचा पूर्णपणे दुष्काळ निर्माण झाल्याने, उरण, अलिबाग, मुरु ड, रेवस- बोडणी येथील पारंपरिक मासेमारी करणाºया कोळी बांधवांना आपापल्या बोटी बंदरात उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रु पयांच्या आथिक नुकसानीमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एलईडी लाइटद्वारे सुरू असलेल्या मासेमारीवर केंद्र शासनाच्या १० नोव्हेंबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. सागरी किनारपट्टीपासून १२ नॉटिकल माइल्सच्या बाहेर असलेल्या सागरी क्षेत्रात एलईडी लाइट फिशिंग करणाºया बोटी व ट्रॉलर्सवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार भारतीय तटरक्षक दलास देण्यात आलेले आहेत.
एलईडी फिशिंग बंद करण्याच्या मागणीकरिता जिल्ह्यामध्ये शांततेच्या मार्गाने विविध सभा, बैठका पार पडल्या आहेत.
१२ नॉटिकल माइल्स सागरी क्षेत्रात मासेमारी
एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंगवर केंद्र सरकारने सक्त बंदी घातली आहे. या आदेशान्वये किनाºयापासून १२ नॉटिकल माइल्स सागरी क्षेत्रात मासेमारी करणाºया १३३ बोटींवर कारवाई केली आहे.
त्यापैकी सहा बोटी एलईडी लाइट फिशिंगच्या, तर उर्वरित १२७ पर्सिसीन नेट फिशिंगच्या बोटी असल्याची माहिती रायगड मत्स्य विभागाचे सहायक उपायुक्त अविनाश नाखवा यांनी दिली. कारवाई करण्यात आलेल्या या १३३ बोटींपैकी ६७ बोटी अलिबाग तालुक्यातील आहेत, तर उर्वरित ६६ बोटी ससून डॉक मुंबईतील असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Persecin net crash: Action by 133 boats from Fisheries Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.