माथेरानमध्ये कामाला परवानगी, डिसेंबरपासून कामाला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:24 AM2017-11-15T02:24:52+5:302017-11-15T02:25:25+5:30

माथेरान, या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी कोणतेही बदल करताना सनियंत्रण समिती आणि वन विभागाच्या परवानग्या यांना मोठे महत्त्व आहे.

 Permission for work in Matheran, commencement from December | माथेरानमध्ये कामाला परवानगी, डिसेंबरपासून कामाला सुरु वात

माथेरानमध्ये कामाला परवानगी, डिसेंबरपासून कामाला सुरु वात

googlenewsNext

अजय कदम 
माथेरान : माथेरान, या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी कोणतेही बदल करताना सनियंत्रण समिती आणि वन विभागाच्या परवानग्या यांना मोठे महत्त्व आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माथेरान गावातील मुख्य रस्त्याची नव्याने बांधणी आणि काही प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला होता. ९३ कोटींचा निधी सनियंत्रण समिती आणि वनविभागाच्या परवानगीमुळे खर्च होत नव्हता. आॅक्टोबर महिन्यात स्थळ पाहणी करून रायगड वन विभागाने माथेरानमधील पायाभूत सुविधांमधील मैलाचा दगड ठरू शकेल, अशा कामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे काही महिन्यांनी माथेरान आणखी सुंदर पर्यटन स्थळ बनलेले दिसेल.
ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर त्या वेळपासून वाहनांना बंदी आहे. तेथील निसर्ग आबाधित राखण्यासाठी पर्यावरणप्रेमी संघटना प्रचंड आक्रमक असतात.
वाहनांना बंदी असलेल्या लाल मातीचे रस्ते असलेल्या प्रदूषणमुक्त माथेरानमधील प्रत्येक हालचालीवर पर्यावरणप्रेमींचे लक्ष असते. तेथील निसर्गसौंदर्य आबाधित राहावे, म्हणून शासकीय यंत्रणा कायम लक्ष ठेवून असतात. अशा माथेरानसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने पर्यावरण आबाधित राखत विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरानला जाण्यासाठी ज्या दस्तुरी नाका येथे वाहने ठेवून पुढे जावे लागते, त्या ठिकाणापासून माथेरान नगरपालिकेपुढे असलेल्या शिवाजी महाराज नगरपर्यंत म्हणजे महात्मा गांधी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याच वेळी माथेरानमध्ये येणारे पर्यटक हे प्रेक्षणीय स्थळांच्या प्रेमात पडतात. हे लक्षात घेऊन पॅनोरमा पॉइंट, मायरा पॉइंट, हार्ट पॉइंट, एको पॉइंट या चार स्थळांचे सौंदर्य आबाधित राखण्यासाठी रस्ते, सुरक्षा विषयक काळजी घेण्याची कामे प्राधिकरणाने प्रस्तावित केली होती.
नेरळ-दस्तुरी नाका-घाट रस्ता आणि पुढील कामांसाठी १२३ कोटींचा निधी प्राधिकरणने मंजूर केला होता. २०१५मध्ये मंजूर झालेला निधी वन विभाग आणि सनियंत्रण समितीच्या परवानगीअभावी खर्च करता आला नव्हता. प्राधिकरणाने डिसेंबर २०१६मध्ये वनविभागाकडे ही कामे करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, बांधकामांना बंदी असलेल्या आणि वनजमिनीवर कोणतीही कामे करण्यास परवानगी नसल्याने सर्व प्रस्ताव लाल मातीत
रु तून बसले होते. सनियंत्रण समितीचे गठन होताच, माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने प्राधान्य म्हणून एमएमआरडीएच्या कामांना मंजुरी देण्यासाठी आपली भूमिका नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी लावून धरली. आॅगस्ट महिन्यात झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी वासुदेव गोरडे यांनी समितीकडून परवानगी दिली होती आणि वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता निर्देशित केली होती.
घोड्यांना क्ले पेव्हर ब्लॉक वरून चालताना कोणताही त्रास होत नसल्याने अश्वपालही नवीन रस्त्याची प्रतीक्षा करीत आहेत.
वनविभागाचे उपवनसंरक्षक मनीष कुमार यांच्या पथकाने आॅक्टोबर महिन्याच्या सुरु वातीला एमएमआरडीएने परवानगी मागितलेल्या रस्त्याची, प्रेक्षणीय स्थळांची पाहणी केली. त्यानंतर वन अधिनियम 1980 नुसार काही अटी घालून परवानगी देणारे पत्र जिल्हा उप वनसंरक्षक यांच्या कार्यालयाने २८ आॅक्टोबर रोजी एमएमआरडीएला दिले आहे.
1907 च्या मुंबई गॅझेटमध्ये माथेरानमधील रस्त्यांची लांबी-रुं दी नमूद केली आहे. त्याच भागात प्राधिकरणला कामे करण्याची परवानगी दिली आहे. माथेरान आणि घोडे हे समीकरण असून, घोड्यांना चालताना त्रास होऊ नये म्हणून दगडांपासून बनलेले पेव्हर ब्लॉक या रस्त्यांसाठी वापरले जाणार आहेत. माथेरानमध्ये यापूर्वी दोन रस्ते क्ले पेव्हर ब्लॉकने तयार केले असून, तो प्रयोग यशस्वी झाल्याने महात्मा गांधी रस्ता क्ले पेव्हर ब्लॉकचा केला जाणार आहे. सध्या माथेरानमधील रस्ता अर्धा पेव्हर ब्लॉक आणि अर्धा मातीचा आहे.

Web Title:  Permission for work in Matheran, commencement from December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.