पेण-अलिबाग रेल्वे प्रवासी वाहतूक केवळ दिवास्वप्नच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:21 PM2019-03-04T23:21:26+5:302019-03-04T23:21:35+5:30

अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करणार असल्याचा विचार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्र मात व्यक्त केला.

Pen-Alibag railway passenger traffic is just a daymare | पेण-अलिबाग रेल्वे प्रवासी वाहतूक केवळ दिवास्वप्नच

पेण-अलिबाग रेल्वे प्रवासी वाहतूक केवळ दिवास्वप्नच

googlenewsNext

- जयंत धुळप 
अलिबाग : अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करणार असल्याचा विचार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्र मात व्यक्त केला. मात्र अलिबाग-पेण रेल्वेमार्गच मुळात अस्तित्वात नाही. त्यामुळे या मार्गावर नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू कशी होणार? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे. परिणामी येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेण-अलिबाग रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक हे दिवास्वप्नच असल्याची भावना सध्या अलिबागकरांकडून व्यक्त होत आहे.
पेण-अलिबाग हा २९ किलोमीटरचा रेल्वेमार्ग टाकण्यात येईल व अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय रेल्वेने जोडले जाईल, असे आश्वासन गीते यांनी रायगडचे खासदार झाल्यानंतर पत्रकारांना दिले होते. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अलिबागला येऊन या अनुषंगाने पाहणीही केली. रेल्वे मंत्रालयाने पेण-अलिबाग रेल्वे मार्गाला मान्यता दिली असून सिडको आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सहकार्याने पेण-अलिबाग रेल्वे मार्गाचे काम करण्यात येणार असल्याचे गीते यांनी सांगितले होते.
आरसीएफ प्रकल्पाने आपल्या मालवाहतुकीसाठी पेण-वडखळ ते थळ(आरसीएफ) असा रेल्वेमार्ग केला आहे. या मार्गावरून ‘आरसीएफ’ची रेल्वे वाहतूक सुरू आहे. मालवाहतुकीसाठी टाकलेला हा रेल्वेमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल भारतीय रेल्वेने सर्वेक्षणांती दिला. या पेण-अलिबाग रेल्वे मार्गासाठी ३३८ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.
अलिबाग ते पेण रेल्वे मार्गासाठी २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली. मध्य रेल्वे आणि एमएमआरडीएच्या संयुक्त भागीदारीतून या प्रकल्पाला लवकरच सुरु वात होवू शकेल अशी परिस्थिती एकीकडे निर्माण झाल्यावर, पेण-धरमतर-थळ-वरसोली (अलिबाग) या प्रस्तावित प्रवासी मार्गामध्ये बदल झाला. म. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भेट दिल्यानंतर ‘धरमतर ते थेट अलिबाग’ असा प्रस्ताव तयार केला होता. सध्या अस्तित्वात असणाऱ्या वडखळ-अलिबाग या रस्त्याला समांतर आणि कार्लेखिंड येथे बोगदा असा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.
>पुन्हा निवडणूक आली तरी रेल्वे मार्गाचा पत्ता नाही
अलिबाग शहराचा एमएमआरडीए झोनमध्ये समावेश असल्याने या मार्गासाठी मध्य रेल्वे आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य सरकारने प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून दिले की पेण-अलिबाग रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळेल.
अलिबाग-वडखळ रस्त्यालगत २८ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग टाकल्यास त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. भूसंपादनानंतर रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल. यासाठी जवळपास ३७५ कोटी रु पये खर्च येईल. आरसीएफ कंपनीच्या विद्यमान रेल्वे मार्गाचा वापर केल्यास प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाचू शकेल. आता लोकसभेची पुन्हा निवडणूक आली तरी पेण-अलिबाग रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही, हेही वास्तव आहे.
>केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वास्तवता विचारात न घेता केवळ लोकसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून, पेण-अलिबाग पॅसेंजर ट्रेनची घोषणा केली आहे. कार्लेखिंड बोगदा करून अलिबागला रेल्वे आणणे, याकरिता बराच कालावधी लागेल, केवळ बोगदा करण्याकरिताच पाच वर्षे लागतील. धरमतर-चोंढी-थळ-अलिबाग असा रेल्वेमार्ग आरसीएफच्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गाचा वापर करून केल्यास अलिबागेत रेल्वे लवकर येवू शकेल.
- जयंत पाटील, आमदार
रायगड जिल्हा प्रशासनाकडे रोहा ते वीर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण आणि पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग याकरिताच्या भूमिसंपादनाचा प्रस्ताव होता. ते काम पूर्ण करण्यात आले आहे. पेण-अलिबाग रेल्वेमार्गाच्या भूमिसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यास त्याकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
- डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.

Web Title: Pen-Alibag railway passenger traffic is just a daymare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.