भातशेतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:54 AM2018-05-20T02:54:51+5:302018-05-20T02:54:51+5:30

खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.

The pace of paddy cultivation | भातशेतीच्या कामाला वेग

भातशेतीच्या कामाला वेग

Next

रोहा : मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील खांब कोलाड विभागात भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी चांगले पीक येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.
उन्हाळ्यात या भागातील नडवली, खांब, वैजनाथ, पुंगाव, मुठवली, शिरवली, पुई, गोवे, कोलाड, महादेववाडी, चिंचवली, तिसे आणि तळवली या गावांतील शेतकºयांना धरणाचे मुबलक पाणी मिळत असल्याने उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.
खांब कोलाड विभागातील शेतकºयांनी या वर्षीही लवकर तयार होणाºया बी-बियाण्यांची लावणी केली आहे. लवकर तयार होणाºया भातशेतीमध्ये रत्ना, कोलम, कलिंगड, रूपाली या बियाणांचा समावेश होतो. तर उशिरा येणाºया भाताच्या जातीमध्ये जया, आयराट या बियाण्यांचा समावेश आहे. रोह्यातील पोहा हा संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध मानला जातो. पोहा बनविण्यासाठी जया, आयराट या जातीचा जास्त वापर होत असतो.
गेली सहा वर्षे कालव्याला पाणी येत नसल्याने रोहा तालुक्यातील ३० टक्के शेती ही कालव्याच्या पाण्यावर केली जात आहे. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने या वर्षी तरी भाताला क्विंटलमागे २००० इतका हमीभाव मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. यावर्षी २००० ते २२०० इतका भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. याचप्रमाणे यंदा शेतकºयांना चांगला हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी संघटनांकडून होत असून दुबार पीक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.

माणगाव तालुक्यामध्ये भातकापणीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : माणगाव तालुक्यामध्ये दुबार भातशेती कापणीला वेग आल्याने शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यात कालव्यातून मिळणाºया पाण्यामुळे शेतकरी दुबार भातशेती करू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत कालवे तयार करण्यात आल्याने शेतीला त्याचा फायदा होत आहे. माणगावमध्ये एकूण ३३०० हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. यात जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत-५, इ. वाणांची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करण्यात आली आहे. साधारणत: ही लागवड जानेवारी महिन्यात केली जात असून, सध्या भातशेती कापणी वेगाने चालू आहे. आठ दिवसांत कापणी पूर्ण होईल. उन्हाळी भात पिकाचे ४५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन येते, या हंगामातील भातशेतीवर कमी प्रमाणामधे कीड व रोगाचा प्रार्दुभाव आढळून येतो. उन्हाळी भात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून विविध प्रशिक्षण, अभ्यासदौरे व चर्चासत्रांचे नियोजन केले होते. माणगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांनी दुबार पीक घेणाºया शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

Web Title: The pace of paddy cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी