वनराई बंधा-यांतून पाणीटंचाईवर मात, पाच हजार बंधारे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 03:01 AM2017-11-07T03:01:01+5:302017-11-07T03:01:10+5:30

भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यासाठी बंद पडलेल्या वनराई बंधारे योजना रायगड जिल्हा परिषद आता पुन्हा सुरू करणार आहे

Over one-third of the bunds will be constructed under forest blockade; | वनराई बंधा-यांतून पाणीटंचाईवर मात, पाच हजार बंधारे बांधणार

वनराई बंधा-यांतून पाणीटंचाईवर मात, पाच हजार बंधारे बांधणार

Next

अलिबाग : भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यासाठी बंद पडलेल्या वनराई बंधारे योजना रायगड जिल्हा परिषद आता पुन्हा सुरू करणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाच हजार वनराई बंधारे बांधण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्था, लोकसहभागाची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया पाणीटंचाईवर काही अंशी मात करता येणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. त्यामुळे तेथील नद्या, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे हे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. पाणी थांबण्याची प्रक्रि या होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसाचा जिल्ह्याला म्हणावा तसा उपयोग होत नाही. परिणामी मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. काही ठिकाणी तर नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते.
यावर उपयायोजना म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा अशी योजना तत्कालीन सरकारने आखली होती. त्या योजनेच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या ठिकाणच्या नद्या, नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात आले होते. २00४ मध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास भोसले यांनी वनराई बंधाºयांची संकल्पना प्रभावीपणे जिल्ह्यामध्ये राबविल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने पाणीटंचाई काही प्रमाणात कमी झाली होती.
कालांतराने २00८ पासून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम थंडावत गेली होती. ती आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांनी सुरू केला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ७८ वनराई बांधरे बांधण्यात आले आहेत.
वनराई बंधाºयांद्वारे पावसाळ्यात वाहणाºया नदी, नाल्यातील पाणी थांबविले जाते. हे पाणी जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत उपयोगात येते. या पाण्यावर शेतकºयांना भाजीपाला पिकासाठी पाणी उपलब्ध होते. २00८ पासून ही मोहीम थंडावत गेली. मागील वर्षी अगदी थोड्याप्रमाणात वनराई बंधारे बांधले होते. पूर्णपणे लोकसहभागातून बांधण्यात येणाºया वनराई बंधाºयांच्या कामासाठी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, एनजीओ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावलकर आंबेपूर येथे एका कार्यक्र मासाठी गेले होते. तेथे त्यांनी सागाव येथील वनराई बंधाºयाचे प्रात्यक्षिक पाहिले. त्यांनी ही संकल्पना रायगड जिल्ह्यात नव्याने राबविण्याचे ठरवले. लोकसहभागातून रायगड जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे लक्षांक देण्यात आले आहे. बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असणाºया बॅगा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. पूर्वी ही योजना कृषी विभागाकडे होती, ती आता पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून सक्षमपणे राबविली जाणार आहे, असे जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Over one-third of the bunds will be constructed under forest blockade;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण