महाडनजीक अपघातात एक ठार, ३५ प्रवासी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 1:19am

मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.

महाड : मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला. एमएच ०६ बीडी ७८२ या क्रमांकाचा टेम्पो पोलादपूरकडून महाडकडे येत असताना, चालक नाविद अब्बास वास्ता (रा. मेटकर्णी, श्रीवर्धन) याने टेम्पो नव्या पुलावरून नेण्याऐवजी जुन्या पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी या पुलावरून महाडकडून गुहागरकडे जात असलेली एमएच २० बीएल ८०३२ या क्र मांकाची एसटी आली. त्यामुळे गोंधळलेल्या नाविद अब्बास वास्ता याचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो या बसवर जाऊन धडकला. या अपघातात नाविद वास्ता याचा मृत्यू झाला, तर बसचालक आणि वाहकांसह बसमधील ३३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना दुसºया बसने गुहागरकडे रवाना करण्यात आले. या प्रकरणी बसचालक मुख्तार वजीर सय्यद (गुहागर आगार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

संबंधित

सावधान, सेल्फी, चित्रीकरण करताना ठेवा भान
करुणाजनक : वृद्धेचा जीव गेला अन् मुलगा आरोपी बनला
मासे मारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू
घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला, वाहतूक विस्कळीत
Amritsar Train Tragedy : 'आईचं ऐकलं नसतं तर मलाही ट्रेननं चिरडलं असतं!'

रायगड कडून आणखी

पुरुषांनाही हवा आहे साहाय्यता कक्ष
वाढते वायुप्रदूषण चिंताजनक, हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले
आंबेनळी घाटात ५० फूट खोल दरीत कार कोसळली
पोलिसांच्या चकमकीत फैयाज शेख जखमी
ठेकेदाराकडे पैसे मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक

आणखी वाचा