जिद्दीने के ली अपंगत्वावर मात

अमूलकुमार जैन 
बोर्लीमांडला : साईनाथ पवार यांचा जन्म १९ सप्टेंबर १९८१मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या दुसºया वर्षी ताप येऊन पोलिओ ने दोन्ही पाय गेले. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड. यासाठी आईवडिलांनी मोलाची साथ दिली, अशा परिस्थितीतही स्वत: पायावर उभे राहायच्या या जिद्दीतून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण, घरापासून १० कि.मी. लांब अंतरावर असणाºया अलिबाग येथे छोटा भाऊ वैजनाथ व मित्र सूरज नाडकर, इरफान लोकरे यांच्या मदतीने पूर्ण केले. अथक परिश्रमाने रायगड जिल्हा परिषद येथे भरती प्रक्रि येत निवड होऊन सेवेत रु जू झाले.
सा.प्र. विभाग, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभागात त्यांनी काम केले आणि आता ते समाज कल्याण विभागाच्या अपंग कल्याण कक्षात कार्यरत आहेत. स्वत: अपंग असल्याने आपल्याला मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. जिल्ह्यातील सर्व अपंगांना एकत्र करून प्रत्येकाला स्वावलंबी बनविण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. १९९५मध्ये दोन्ही पायांवर मुंबई येथे अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय हाजी अली येथे शस्त्रक्रिया केल्याने त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता आले. शस्त्रक्रि या करण्याआधी हातावर लहान मुलांसारखे रांगत होते. स्वत: ९० टक्के अपंगत्व असताना त्यावर मात करून जिद्दीने अपंगांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, पद, रायगड जिल्हा अपंग संघर्ष समितीचे अध्यक्ष पदभार ते उत्तमरीत्या पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०१६ला ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.