नेरळ-कळंब जिल्हा मार्ग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:37 AM2018-07-27T00:37:04+5:302018-07-27T00:37:57+5:30

रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता

Neral-Kalamb district route has been delayed | नेरळ-कळंब जिल्हा मार्ग खचला

नेरळ-कळंब जिल्हा मार्ग खचला

Next

नेरळ : नेरळ-कळंब जिल्हा मार्गावरील बिरदोले गावाजवळ बुधवारी सकाळी अचानक रस्ता खचला आहे. या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून, येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नसल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधानपणे वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिक व नेरळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर बिरदोले गावाजवळ असणारी मोरी खचून पूर्ण रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमीन खचली असल्याचे बोलले जात आहे. नेरळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत असून, अनेक प्रवाशांना सूचना देत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावरील हा खचलेला भाग लवकरात लवकर चांगला करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या या रस्त्यावरून दुचाकी जात असल्या तरी चारचाकी वाहने जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठा मोर्चामुळे ठेकेदारांनीही काम बंद केले आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यासाठी माणसे मिळत नाही. त्यामुळे लवकरच या रस्त्यावरील खचलेला भाग भरण्यात येईल आणि रस्ता चांगला करण्यात येईल.
- आर. एम. वेलदोडे, शाखाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग

नेरळ-कळंब रस्ता बिरदोले गावाजवळ मध्यभागी खचला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. आमच्याकडून वाहनचालकांना वाहने सावधानपणे चालवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
- मदन पाटील, वाहतूक पोलीस, नेरळ

Web Title: Neral-Kalamb district route has been delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.