महाडमध्ये नगरपरिषदेची अतिक्र मण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:45 AM2018-12-12T00:45:04+5:302018-12-12T00:45:18+5:30

पोलीस फौजफाट्यासह सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील नागरिकांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे.

Municipal corporation's encroachment drive campaign in Mahad | महाडमध्ये नगरपरिषदेची अतिक्र मण हटाव मोहीम

महाडमध्ये नगरपरिषदेची अतिक्र मण हटाव मोहीम

महाड : शहरात नगरपरिषदेची अतिक्रमण विरोधी मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस फौजफाट्यासह सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील नागरिकांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे.

पिंपळपार येथून सकाळी १० वाजता बाजारपेठ मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरु वात केली. नगरपरिषद मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता सुहास कांबळे तसेच नगरपरिषदेचे सुमारे चाळीसहून अधिक कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. तर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी अतिक्र मणे काढताना व्यापाऱ्यांनी हरकत घेत विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता अतिक्र मणे हटवण्यात येत होती. दोन जेसीबी, कटर्स, चार डम्पर आदी यंत्रणा मोहिमेत कार्यरत होती.

अतिक्रमण हटवण्याची मोहीम १३ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असली तरी त्यानंतर आणखी दोन दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहर स्वच्छता अभियानामध्ये महाड नगरपरिषदेने गतवर्षी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अव्वल मानांकन मिळवले असल्याने यंदाच्या स्वच्छता अभियान स्पर्धेत देखील महाड नगरपरिषदेने राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थानी राहण्याचा संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अतिक्रमणांमुळे आलेला बकालपणा, तसेच मुख्य मार्गांवर नियमितपणे होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी नगरपरिषदेने ही अतिक्र मण हटावची धडक मोहीम हाती घेतली आहे.

आ. भरत गोगावले यांची बैठक
महाड शहरातील अनधिकृत व अतिक्र मण झालेली बांधकामे हटवण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या निर्णयाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देत कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना आमदार भरत गोगावले यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीमध्ये दिल्या आहेत.

Web Title: Municipal corporation's encroachment drive campaign in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.