जांभूळपाडा-कळंब मार्गावर मोरी खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:33 AM2018-07-15T02:33:26+5:302018-07-15T02:33:27+5:30

सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Mori dumps on Jambhalpada-Kalamb Marg | जांभूळपाडा-कळंब मार्गावर मोरी खचली

जांभूळपाडा-कळंब मार्गावर मोरी खचली

googlenewsNext

राबगाव /पाली : सुधागडामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे पाली-खोपोली महामार्गचा रस्ता वाहून गेल्याची घटना ताजी जांभूळपाडा-कळंब मार्गावरील मोरी खचल्याने रस्ता धोकादायक बदला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
या मोरीचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. जांभूळपाडा-कळंब या मार्गावर असलेली मोरी खचल्याने अनेक गावांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या मोरी लवकरात लवकर दुरुस्त करून जांभूळपाडा-कळंब रस्ता वाहतुकीसाठी पूर्वव्रत करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत
आहे.
जांभूळपाडा-कळंब हा रस्ता अनेक गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा मार्ग घोडपापड, कळंब, मुळशी, कैलोशी, कणी धनगरवाडी, जाधववाडी, गाठेमाळ, तसेच या मार्गावरून नवघर, असरे, फलसुंडे, कासारवाडी या खेडे गांवांना जोडणारा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व बाबींवर लक्ष देऊन खचलेल्या मोरीची तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदारांवरही कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे. खचलेल्या मोरीचे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतल्या सर्व सामान्य जनतेतून होत आहे.

Web Title: Mori dumps on Jambhalpada-Kalamb Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.