म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची वीज महावितरणने कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:07 AM2018-02-22T01:07:09+5:302018-02-22T01:07:14+5:30

येथील ग्रामीण रु ग्णालयाचे तब्बल ७८,७८० रुपयांचे वीज बिल थकविल्याने मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास महावितरणने वीज कापली

Molasses electricity from Mhasal village is cut by MSED | म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची वीज महावितरणने कापली

म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची वीज महावितरणने कापली

Next

म्हसळा : येथील ग्रामीण रु ग्णालयाचे तब्बल ७८,७८० रुपयांचे वीज बिल थकविल्याने मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास महावितरणने वीज कापली. ग्रामीण रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागला.
मार्च २०१७पासून आजतागायत रुग्णालय वापरत असलेल्या विजेचे बिल न भरल्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयावर विद्युत पुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढावली आहे. म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होऊन जवळपास चार वर्षे झाली आहेत; परंतु शासनाच्या विविध विभागांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे आजतागायत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे या ग्रामीण रुग्णालयाची इमारत हस्तांतरित केली गेली नाही, यामुळे या इमारतीत एकाच वेळी ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, असे आरोग्याचे दोन विभाग कार्यरत असल्यामुळे वीज बिल कोणी भरावे, ही अडचण असल्याचे दोन्ही विभागांचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत; परंतु या विभागाच्या तांत्रिक अडचणी असल्या तरी सरकारी रु ग्णालयाच्या उपचारांवर अवलंबून असणाºया रु ग्णांचे मात्र यामुळे हाल होत आहेत.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रसूतिगृह, प्रयोगशाळा, रुग्ण कक्ष सेवा ठप्प होऊन हजारो रुपयांच्या वेगवेगळ्या लस वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांच्या वीज देयक भरण्याचे आश्वासनानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
 

Web Title: Molasses electricity from Mhasal village is cut by MSED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.