महामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 02:52 AM2018-09-22T02:52:59+5:302018-09-22T02:53:05+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील पुलाच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत

The Mohopre Bridge on the highway, the traffic hampered | महामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात

महामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात

googlenewsNext

- सिकंदर अनवारे 
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील पुलाच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी पुलाचा भाग खचल्यासारखा दिसतो. जुन्या पुलाला लागून या ठिकाणी नवीन व रुंद पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र काही अंतरावरच चौपदरीकरणाच्या पुलाच्या कामासाठी नदीत मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. पुलावर वाढलेले वृक्ष आणि वाहनांच्या हादऱ्यांमुळे पुलावरील भागाला तडे गेले आहेत. सदर पुलाची पाहणी करु न दुरु स्ती न केल्यास सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई -गोवा महामार्गावर ३०० च्या आसपास ब्रिटिशकालीन बांधकाम केलेले छोटे-मोठे पूल आहेत. २०१६ मध्ये घडलेल्या महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेने या ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आणि दुरु स्ती हा विषय पुढे आला होता. मात्र केवळ पाहणी आणि साफसफाई व्यतिरिक्त या ठिकाणी काहीच करण्यात आलेले नाही. महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी येथील सावित्री पूल आणि मोहोप्रे येथील गांधारी पूल हे दोन मोठे पूल असून यावरु न अवजड आणि हलके अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. हा देखील ब्रिटिश कालीन टू आर्च बांधकाम पद्धतीचा पूल आहे. हा पूल उंच आणि अरुंद असल्याने दहा वर्षापूर्वी याच पुलाला लागून या ठिकाणी काँक्रीटचा पूल जोडण्यात आला.
नवीन बांधकामामुळे पुलाची रु ंदी वाढल्याने वाहतूक सुरळीत होवू शकली. मात्र या ठिकाणी १00 वर्षांपूर्वीचे बांधकामासोबत आधुनिक पद्धतीच्या सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाची सांगड घालण्यात आली आहे. याच पुलाच्या शेजारी नदीत चौपदरीकरणाच्या पुलाचे नव्याने काम सुरु आहे. यासाठी या ठिकाणी मोठ मोठे खंदक खोदून खोदकाम करण्यात आले आहे. तसेच नदीच्या पाण्याचा प्रवाहही बदलण्यात आला आहे.
पुलाभोवती मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असून दगडांच्या बांधकामातील भेगांमधून पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून या पुलाच्या पृष्ठभागावर भेगासदृश चिरा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी गोलाकार पद्धतीचे भाग काही इंचांनी खचला आहे. पुलावरील होणारी अवजड वाहतूक पाहता सदर पूल हा धोकादायक स्थितीत अल्याचे दिसत आहे. या कामी महामार्ग बांधकाम विभागाची भूमिका महत्त्वाची असून, तत्काळ या पुलाची पाहणी करून योग्यती दुरु स्ती करण्याची गरज आहे.
>मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी येथील सावित्री पूल आणि मोहोप्रे येथील गांधारी पूल हे दोन मोठे पूल असून अवजड आणि हलकी अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. हा देखील ब्रिटिशकलीन टू आर्च बांधकाम पद्धतीचा पूल आहे.

Web Title: The Mohopre Bridge on the highway, the traffic hampered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.