माथेरानमध्ये वाहनबंदीचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:01 AM2019-03-23T05:01:18+5:302019-03-23T05:01:35+5:30

- कांता हाबळे  नेरळ  - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे ...

 Matheran's Vehicle Violation | माथेरानमध्ये वाहनबंदीचे उल्लंघन

माथेरानमध्ये वाहनबंदीचे उल्लंघन

Next

- कांता हाबळे 
नेरळ  - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्री हा सर्व खेळ सुरू असून या प्रकरणाची माहिती नगरपालिका आणि पोलीस प्रशासन देखील देत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील केले. त्याआधी माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी आहे. रु ग्णवाहिका वगळता माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना येथील लाल मातीच्या रस्त्यावर प्रवेश नाही. त्यामुळे वाहनबंदी आदेशाचे पालन सर्व शासकीय यंत्रणा यांच्याकडून होत असते. मात्र, मागील काही वर्षांत माथेरानमध्ये वाहने घुसवली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका नगरसेवकाने पेव्हर ब्लॉकने भरलेला ट्रक मध्यरात्री घुसवला आणि त्यावर अश्वपाल संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर काही दिवस माथेरानमधील वातावरण गरम झाले होते. हे सुरू असताना माथेरान नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नियोजन करून 
रु ग्णवाहिकेचा अनधिकृत वापर होणार नाही आणि कोणतीही वाहने निर्बंध असलेल्या भागात प्रवेश करणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरु वात केली. मात्र, प्रशासनाच्या सहकार्याबाबत अश्वपाल संघटनेच्या आक्र मक भूमिकेनंतर दस्तुरी नाका येथे माथेरान गावात रुग्णवाहिका येण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट कुलूपबंद केले.
नगरपालिकेने त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र,१३ मार्चच्या रात्री पुन्हा पावणेतीनच्या सुमारास रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन निघालेला ट्रक दस्तुरी नाका येथील लोखंडी गेटचे कुलूप उघडून आतमध्ये शिरले. याबाबत १८ मार्चपर्यंत माथेरानमध्ये कोणालाही कोणतीही माहिती 
नव्हती. मात्र, एका आरटीआय कार्यकर्त्याने दस्तुरी नाका येथे लोखंडी गेटवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता १३ मार्च रोजी दोन ट्रक शहरात गेले असल्याचे उघड झाले.त्या कार्यकर्त्याने त्याबाबत माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फुटेजचे व्हिडीओ पाठवले. त्याचवेळी अलिबागमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची क्र ाइम मीटिंग सुरू होती.
ब्रिटिश काळापासून आलेले नियम डावलून होत असलेली वाहनांची घुसखोरी याबद्दल आदेश दिल्यानंतर माथेरान पोलिसांनी घटना घडल्यानंतर तब्बल सहाव्या दिवशी गुन्हा नोंद केला.  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १३ मार्च रोजी पर्यावरण नियम डावलून आणि वाहनबंदीचा आदेश डावलून शहरात मालवाहतूक करण्यासाठी गेलेल्या दोन ट्रकवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 



माथेरानमधील रस्त्यावर टेम्पो घालणाऱ्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यावर असलेले गेट रात्री सील करण्यात येणार आहे. येथे दिवस-रात्र एक कामगार नेमण्यात येणार असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. फक्त रुग्णवाहिके साठीरस्ता दिला जाईल, रुग्णवाहिके च्यानावाखाली अनेक जण गैरफायदा घेत आहे; परंतु यापुढे कठोर कारवाई केली जाईल.
    - रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान, नगरपालिका

Web Title:  Matheran's Vehicle Violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.