माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:12 AM2017-11-20T05:12:21+5:302017-11-20T05:12:43+5:30

मित्रासोबत मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी महाबळेश्वर येथे जात असताना, त्याचे गाडीतून अपहरण करून त्याला जबर मारहाण करत, सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली.

Matheran kidnapped kidnapped youth | माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या

माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या

googlenewsNext

माथेरान : माथेरानचा तरुण योगेश गोरे आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी महाबळेश्वर येथे जात असताना, त्याचे गाडीतून अपहरण करून त्याला जबर मारहाण करत, सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली. या घटनेत योगेश याचा मृत्यू झाला आहे.
माथेरानचा तरु ण योगेश गोरे हा आपला मित्र अक्षय परब याच्यासोबत मोटारसायकलवरून महाबळेश्वरच्या दिशेने जात असताना, याच दरम्यान १४ नोव्हेंबर रोजी भोरजवळ त्याची दुचाकी एका गाडीला घासली, यामुळे त्या गाडीतील लोकांबरोबर त्यांचा वाद झाला. नुकसानभरपाई म्हणून १० हजार रुपये देण्याची त्याच्याकडे मागणी करण्यात अली. या दरम्यान, त्याने त्याचे मेव्हणे सखाराम ढेबे यांना फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली.
त्यावेळी त्यांनीदेखील नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली आणि त्या गाडीतील लोकांना सातारा येथील गॅरेजमध्ये येण्याचे सांगितले. योगेश गोरे याला बलेरो गाडीत बसविण्यात आले. काही अंतर पुढे गेल्यावर योगेश त्याच्या मित्राला रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. या वेळी योगेशला त्याच्या मित्राने स्थानिकांच्या मदतीने तत्काळ १०८ रु ग्णवाहिकेने साताºयाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना भुर्इंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या वेळी योगेशची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असणाºया योगेशचा १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा.च्या सुमारास पुणे येथील रु ग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, डोक्यात जबर दुखापतीतून मृत झाल्याचे स्पष्ट झाले असून, या घटनेची नोंद बिबवेवाडी, कात्रज, पुणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या दरम्यान, योगेशचे मेव्हणे सखाराम ढेबे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणामधून घटनेची उकल आणि ज्या गाडीशी संबंधित ही घटना घडली, त्या गाडीचा क्र मांक एमएच १० सीजे ९८१३ हा समजला आहे.

Web Title: Matheran kidnapped kidnapped youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.