माथेरानमध्ये मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:13 PM2019-05-24T23:13:44+5:302019-05-24T23:13:51+5:30

पर्यटन व्यवसायाला चिंता नाही : एमजीपीमार्फत पाणीपुरवठा

Matheran contains plenty of water | माथेरानमध्ये मुबलक पाणीसाठा

माथेरानमध्ये मुबलक पाणीसाठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : महाराष्ट्र पाणीटंचाईने होरपळत असताना त्यांच्या झळा रायगड जिल्ह्यातही सोसाव्या लागत आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यातील आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा असल्याने पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माथेरान या पर्यटनस्थळाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. नेरळ-कुंभे तसेच येथील शार्लोट तलावातून पाणीपुरवठा केला जातो. माथेरानकरांना पाणीटंचाईच्या झळा लागू नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योग्य नियोजन केले असून, शार्लोट तलावाच्या पाण्याचा उपसा केला नसल्यामुळे मे महिन्यापर्यंत २८ फूट पाणीसाठा शिल्लक आहे.
आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत नेरळ-कुंभे येथून पाणी दिले जाते व मार्चपासून शार्लोट तलावातून पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे ६० फूट खोल व अर्धा किलोमीटर रुंद असलेल्या शार्लोट तलावातून अडीच महिन्यांत फक्त ३२ फूट पाणीउपसा झाला आहे व २८ फूट पाणी शिल्लक असल्याने माथेरानमध्ये मुबलक पाणीसाठा आहे.
माथेरानला पाणीपुरवठा करताना आम्ही नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला. नेरळमधून एक एमएलडी व माथेरान शार्लोट तलावातून पाच एमएलडी पाणी माथेरानकरांना देत आहोत, त्यामुळे १५ जूनपर्यंत विनाव्यत्यय माथेरानकरांना पाणी मिळणार आहे.
मात्र, जर वीजपुरवठा खंडित झाला तर लोकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होते, अशी माहिती राजेंद्र हावळ उपअभियंता यांनी दिली. यावर्षी एमजेपीने नियोजनबद्ध काम करून पाणीपुरवठा केला आहे, त्यामुळे या वर्षी आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नाही ही पर्यटन व्यवसायासाठी चांगली बाब असल्याचे पवन गडवीर यांनी सांगितले.

Web Title: Matheran contains plenty of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.