जेएनपीटीवर मनसेची धडक, ट्रॉमा सेंटर लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 04:52 AM2018-12-20T04:52:03+5:302018-12-20T04:52:16+5:30

येत्या १५ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन

MASKA, Trauma Center at JNPT soon | जेएनपीटीवर मनसेची धडक, ट्रॉमा सेंटर लवकरच

जेएनपीटीवर मनसेची धडक, ट्रॉमा सेंटर लवकरच

googlenewsNext

उरण : जेएनपीटीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या समस्यांंचा जाब विचारण्यासाठी बुधवार, १९ रोजी मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनसेने जेएनपीटीलाच धडक दिली. गेल्या २८ वर्षांपासून जेएनपीटीचे हॉस्पिटल सोयी-सुविधा आणि अपुऱ्या कर्मचाºयांअभावी कोमातच असलेल्याची स्पष्ट कबुली जेएनपीटीचे वरिष्ठ प्रबंधक जयवंत ढवळे यांनी मनसे पदाधिकाºयांशी बोलताना दिली.

तरीही दरमहा जेएनपीटी प्रशासन या हॉस्पिटलवर नाहक करीत असलेल्या खर्चाला आळा घालण्यासाठी आणि कर्मचाºयांंसह आठ कि.मी. परिसरातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी येत्या अडीच महिन्यांत अद्ययावत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येणार आहे. या कामासाठी येत्या १५ दिवसांतच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, ट्रॉमा सेंटर आउटसोर्सिककडे चालविण्यासाठी देण्यात येईल, असे ठोस आश्वासन जेएनपीटीचे वरिष्ठ प्रबंधक जयवंत ढवळे यांनी मनसे पदाधिकाºयांना दिले. या वेळी मनसेचे सीएचए कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष धुरी, जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, अभय काशिद, तालुका अध्यक्ष अभिजित तांडेल, उरण शहर अध्यक्ष जयंत गांगण आणि जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या वेळी मनसेच्या नेत्यांनी जेएनपीटीच्या दुरवस्थेत असलेल्या हॉस्पिटलची पाहणी केली. या पाहणीत आयसीयू विभाग नसणे, डॉक्टरची संख्या नगण्य असणे, एक्सरे विभाग आॅपरेटरविना बंद असणे आदी कारणांमुळे हॉस्पिटलची सेवाच कोलमडली असल्याची कबुली वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. तसेच या जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी अन्य हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचेही सांगण्यात आले. जेएनपीटीच्या हॉस्पिटलच्या पाहणीनंतर मनसेच्या पथकाने जेएनपीटी वरिष्ठ प्रबंधक जयवंत ढवळे यांची भेट घेतली. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी येत्या अडीच महिन्यांत अद्ययावत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येणार आहे. या कामासाठी येत्या १५ दिवसांतच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून ट्रॉमा सेंटर आउटसोर्सिककडे चालविण्यासाठी देण्यात येईल, असे ठोस आश्वासन जेएनपीटीचे वरिष्ठ प्रबंधक जयवंत ढवळे यांनी मनसे पदाधिकाºयांशी बोलताना दिले. सदर चर्चेचा अहवाल मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

मनसेच्या इंजिनला जेएनपीटी सीआयएसएफचा ब्रेक
च्जेएनपीटीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या समस्यांंचा जाब विचारण्यासाठी बुधवार, १९ रोजी मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटीला धडक देण्यासाठी निघालेल्या पदाधिकारी, नेत्यांना जेएनपीटी सीआयएसएफच्या जवानांनी कामगार वसाहतीच्या गेटवरच रोखून धरले.
च्मनसे आणि सीआयएसएफची तब्बल २० मिनिटांची बाचाबाची, शिवीगाळ, धक्काबुक्की झाल्यानंतर फक्त मनसे नेत्यांच्या तीन गाड्या सोडण्यात आल्या, त्यामुळे मनसेला जेएनपीटी हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास पायीच करावा लागला. जेएनपीटी प्रशासनात प्रवेशासाठीही फक्त पाच नेत्यांनाच प्रवेश देण्याचा फतवा काढण्यात आला होता. पुन्हा सीआयएसएफ आणि मनसेमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर बैठकीसाठी १५ पदाधिकाºयांना परवानगी दिल्यानंतरच बैठक पार पडली.
 

Web Title: MASKA, Trauma Center at JNPT soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड