त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज माणकेश्वर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:52 PM2018-11-21T23:52:38+5:302018-11-21T23:52:56+5:30

उरण परिसरात समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या कुशीत केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माणकेश्वर मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.

 Manikeshwar Yatra on Tripurari Purnima today | त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज माणकेश्वर यात्रा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज माणकेश्वर यात्रा

googlenewsNext

उरण : उरण परिसरात समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या कुशीत केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माणकेश्वर मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. गुरुवारी (२२) येथे माणकेश्वरची यात्रा भरणार आहे.
सुमारे ४०० वर्षांपूर्वी केगाव परिसरातील एका शेतकऱ्यास आपल्या (शेल्टी) शेतात शेत नांगरताना नांगराच्या फाळास रक्त लागलेले आढळले. तेव्हा शेतात शोध घेतला असताना त्या शेतकºयास अर्धे तुटलेले शिवलिंग शेतात सापडले. त्यानंतर त्याने केगाव परिसरातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित लोकांस सदरचा प्रकार सांगून विधिवत पूजाअर्चा करून त्या शिवलिंगाची स्थापना केली. तात्पुरत्या स्वरूपात शिवलिंगावर नारळाच्या झावळ्यांनी छोटेसे मंदिर शाकारले. अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असलेले एकमेव शिवलिंग माणकेश्वर मंदिरात असून ते राज्यात नव्हे तर देशात एकमात्र असे अर्धवट तुटलेले स्वयंभू शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. सन १९९९ साली या मंदिराचा जीर्णोध्दार केला.
उरण तालुक्यातील उरण शहराच्या पश्चिमेस ४.५ कि.मी. अंतरावर केगाव समुद्र किनारी जेथे अरबी समुद्राचा त्रिवेणी संगम होतो अशा पवित्र ठिकाणी माणकेश्वर मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उत्सव, त्रिपुरारी पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर दिवे पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो. दर्शनासाठी ठाणे, रायगड, मुंबई, नवी मुंबई, वसई, अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल, अंधेरी, कर्जत, उरण, अलिबाग तालुक्यातून दरवर्षी माणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी हजारो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. यंदाही गुरुवार (दि.२२) नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने सायंकाळी दीपोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.

Web Title:  Manikeshwar Yatra on Tripurari Purnima today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड