कोकणातील आंबा उत्पादकांची कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:58 AM2018-04-23T03:58:47+5:302018-04-23T03:58:47+5:30

Mango growers in Konkan! | कोकणातील आंबा उत्पादकांची कोंडी!

कोकणातील आंबा उत्पादकांची कोंडी!

Next

अमूलकुमार जैन ।
बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यंदा हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला. हवामान बदलामुळे थंडी लांबणे, अवेळी पाऊस, दोन वेळा आलेला मोहर, तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षीपेक्षा केवळ ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा आंब्याला सोन्याचा भाव आला आहे. राज्य सरकारने २०१६मध्ये शेतीमालाच्या बाजार स्वातंत्र्यासाठी भाजीपाला व फळे नियमनमुक्ती करण्याचा निर्णय घेतला. दलालांच्या जाचातून शेतकºयांची सुटका होण्यासाठी हा निर्णय जरी चांगला असला, तरी शासनाने एपीएमसीमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे आपला माल विकण्यासाठी शेतकºयांना आजही व्यापारी आणि दलालांकडेच जावे लागत आहे. यात दलाल आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. शेतकºयांचा आंबा खरेदी करून तो दुपटीहून अधिक भावाने इतरत्र विकत आहेत.
आंब्यामध्ये कीटकनाशक अंश आढळून आल्यानंतर चार वर्षांपूर्वी आशियाई देशांमध्ये आंब्याची निर्यात थांबण्यात आली होती. वर्षभरानंतर निर्यातबंदी उठवण्यात आली. तेव्हापासून आंब्याची निर्यात चांगल्या प्रकारे होत आहे. पणन विभागाच्या सहकार्याने जल वाहतुकीद्वारेही आंब्याची निर्यात होत आहे. मात्र, यंदा हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. एपीएमसी (मुंबई), एपीएमसी (गुलटेकडी, पुणे), एपीएमसी (कोल्हापूर), या ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये अजूनही ५५ ते ६० टक्के कोकणातील आंबा जातो. मात्र, येथील दलाल आणि व्यापाºयांनाच हाताशी धरावे लागते. परिणामी, शेतकºयांची कायम फसवणूकच होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. आंब्यासाठी देशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास शेतकºयांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही मोकल यांनी व्यक्त केली.

एक नजर आंबा उत्पादनावर
च्कोकणातील आंबा व्यवसायात दरवर्षी सुमारे ११०० कोटींची उलाढाल होते. डझनला जास्तीत जास्त १२०० रु पये, तर किमान २५० ते ३०० रु पये भाव मिळतो.
च्आंब्याची पहिली पेटी साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येते. मात्र, तो केमिकल्स मारलेला असतो. आंब्याचा सीझन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो.

 

संघटनेची प्रमुख मागणी
त्या-त्या जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारणे
देशांतर्गत मार्केटला चालना देणे
देशातील पर्यटनस्थळी आंब्याची विक्री करणे
देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर विक्रीसाठी दालन सुरू करणे
देशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास चांगला भाव मिळेल
महत्त्वाच्या विमानतळांवर आंब्यासाठी गाळे उपलब्ध करून देणे
 

Web Title: Mango growers in Konkan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड