खालापूरमधील व्यसनमुक्ती केंद्राची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:51 AM2018-03-19T02:51:36+5:302018-03-19T02:51:36+5:30

विणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलावर अमानुष अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रातील एकूणच कारभारावर संशय व्यक्त होत आहे. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खालापूरमधील अन्य व्यसनमुक्ती केंद्रांच्या झाडाझडतीला सुरुवात झाली आहे.

Khalapur De-addiction Center Jharkadatti | खालापूरमधील व्यसनमुक्ती केंद्राची झाडाझडती

खालापूरमधील व्यसनमुक्ती केंद्राची झाडाझडती

googlenewsNext

- अमोल पाटील
खालापूर : विणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलावर अमानुष अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रातील एकूणच कारभारावर संशय व्यक्त होत आहे. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खालापूरमधील अन्य व्यसनमुक्ती केंद्रांच्या झाडाझडतीला सुरुवात झाली आहे.
खालापूर तालुक्याच्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील विणेगावात असणाऱ्या कृष्ण माई या बंगल्यात मुंबईतील बेटर लाइफ फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र चालवत होती. या केंद्रात उपचारासाठी आलेल्या तेरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा हनी त्यागी आणि इतर रु ग्णांना बेदम मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यातील आरोपी प्रदीप भगवानदास पटेल आणि मल्हार पटेल या बापलेकासह अन्य चार जण अटकेत आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. व्यसनमुक्ती केंद्रात नेमके चालते तरी काय यावर ‘लोकमत’ने आवाज उठल्यानंतर खालापूर पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी दखल घेऊन तालुक्यातील सर्व व्यसनमुक्ती केंद्रांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
व्यसनमुक्ती केंद्राची तपासणी सुरू केली आहे. केंद्राच्या परवान्यापासून सोयी-सुविधा, उपचार, औषधे आदींसह रु ग्णांसाठी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी याची माहिती देण्यासाठी तालुक्यातील सनराईज व्यसनमुक्ती केंद्राला नोटीस दिली आहे. सनराईज व्यसनमुक्ती केंद्रात या आधीही एका रु ग्णाने दुसºया रु ग्णाचा खून केल्याचा गंभीर प्रकार घडला होता.
>आकाश पिल्ले फरार
विणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात झालेल्या मारहाणीतील आरोपी आकाश पिल्ले हा फरार आहे. आकाशचे वडील परदेशी वकालतमध्ये जनसंपर्क अधिकारी आहेत. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत आकाशचे वास्तव्य आहे. मात्र घटना घडल्यापासून तो फरार आहे. खालापूर पोलिसांची दोन पथके आकाशच्या मागावर आहेत. रु ग्णांना मारहाण करणाºयांमध्ये आकाशचा समावेश आहे.
>खालापूर तालुक्यातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रुग्णांवर नेमके कसे उपचार केले जातात, याची माहिती घेतली जात आहे. याशिवाय उपचार कसे असावे, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी असावा याबाबत सूचनाही करण्यात येत आहेत. तपासणीदरम्यान केंद्रात काही संशयास्पद आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.
- जमील शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खालापूर

Web Title: Khalapur De-addiction Center Jharkadatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.