दीक्षा सोनारला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:39 PM2019-01-18T23:39:50+5:302019-01-18T23:39:55+5:30

कु ष्ठरोग्रस्तांची व्यथा :‘हिज व्हिजन:जस्ट ए ट्रिब्युट’ लघुपट

International Film Festival Invitation to diksha sonar | दीक्षा सोनारला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आमंत्रण

दीक्षा सोनारला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आमंत्रण

Next

अलिबाग : खांदा-पनवेलमधील न्यू हॉरिझन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी दीक्षा सोनार दिग्दर्शित व संकल्पित ‘हिज व्हिजन:जस्ट ए ट्रिब्युट’ या लघुपटाला मानवी हक्क श्रेणीमध्ये चेन्नई येथे होणाऱ्या प्रकृती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन प्राप्त झाले आहे. भारत सरकार यूजीसी अंतर्गत फेस्टिव्हल सीईसी, नवी दिल्ली यांच्यावतीने चेन्नईमधील आण्णा युनिव्हर्सिटी येथे २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रकृती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल होणार आहे, येथे सादरीकरणासाठी दीक्षाला आमंत्रित करण्यात आले आहे.


‘हिज व्हिजन:जस्ट ए ट्रिब्युट’हा लघुपट महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून साकारण्यात आला आहे. हा लघुपट कुष्ठरोगग्रस्त रु ग्णावर आधारित असून कुष्ठरोगावर सकारात्मक बदलाचा महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश दाखविण्यात आला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन व संकल्पना दीक्षा सोनार हिचे असून निर्मिती न्यू हॉरिझन पब्लिक स्कूलची आहे. लघुपटासाठी चित्रण व संकलन सिद्धेश वाळंजू यांनी केले आहे. यासाठी शाळेचे प्राचार्य प्रशांत बुक्कावार, संगीता जगताप व संतोष वाळंजू यांनी मार्गदर्शन केले आहे.


लघुपटासाठी कुष्ठरोग व्यक्तीरेखा नेरे-पनवेल येथील शांतिवनातील राजन साखरकर व शांतिवनातील कुष्ठरोग रु ग्णांनी साकारली असून यासाठी संपूर्ण सहकार्य कुष्ठरोग निवारण समितीचे विष्णू प्रभुदेसाई यांनी केले आहे. कुष्ठरोगाबद्दल माहिती राजन साखरकर, आर.बी.कोल्हे, नीळकंठ कोळी यांनी दिली आहे. दीक्षा सोनार हिचे तिने साध्य केलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: International Film Festival Invitation to diksha sonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.